सद्या व्हॉईस कॉलिंगचा जमाना कमी होऊन व्हाॅट्सॲप कॉलिंगचा जमाना आला आहे. आपल्या फोनमध्ये व्हाईस कॉल रेकॉर्ड करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, व्हाॅट्सॲप कॉल रेकॉर्ड करण्यासाठीची कोणतीही पद्धत अजूनही मिळाली नाही. स्वतः व्हाॅट्सॲपकडूनही अशा पद्धतीची सुविधा देण्यात आलेली नाही. दरम्यान एक पद्धत वापरून आपण व्हाट्सअपचे कॉल रेकॉर्ड करू शकतो. आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून एक ॲप घ्यावे लागेल.
गूगल प्ले स्टोअरवरून आपल्याला cube call recorder नावाचे ॲप डाऊनलोड करून घ्यावं लागेल. cube call recorder डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला व्हाॅट्सॲपवर जावं लागेल. आपल्याला ज्यांच्यासोबत व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करायचा आहे त्यांना तुम्ही कॉल करायचा आहे त्यावेळी cube call चिन्ह मोबाईलच्या वरच्या बाजूला दिसले तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे असे समजायचे. जर आपला कॉल रेकॉर्ड होत नसेल तर सेटिंग्ज या पर्यायावर जात force volp हा पर्याय निवडून पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करा. हे करूनही ॲप काम करत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप चालत नाही असे समजावे.
आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून अॅन्ड्रॉईड मोबाईलवर कोणतेही ॲप सहज लागू होते. परंतु, आयफोनला कोणतेही ॲप सहज लागू होत नाही. दरम्यान आपल्याला आयफोनवरही व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करता येतो त्यासाठी कोणतेही वेगळे ॲप घेण्याची गरज नाही. यासाठी आपल्याला मॅक सिस्टीम आणि दुसऱ्या फोनची गरज लागणार आहे. डेटा केबलद्वारे आपला फोन मॅक सिस्टीमला जोडायचा आहे.
फोन सिस्टीमला जोडल्यानंतर trust this computer हा पर्याय निवडावा. यानंतर मॅकवर क्वीक टाईमचा ऑप्शन निवडावा. ऑडीओ रेकॉर्डींगवर सिलेक्ट करत, क्विक टाईम रेकॉर्डच्या बाजूला आयफोन हा पर्याय निवडावा. यानंतर कॉल करून त्याला दुसरा कॉल करा ज्या व्यक्तीला कॉल केला आहे त्यांच्याशी संवाद झाल्यावर तो कॉल डिस्कनेक्ट झाल्यावर क्विक टाईममधून रेकॉर्डिंग बंद करत मॅकवर कॉलची फाईल सेव्ह करावी.