अकोला- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1045 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 861 अहवाल निगेटीव्ह तर 184 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 593 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सहा जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 106 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 28565(23084+5304+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 159878 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 157245 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2254 नमुने होते. आजपर्यंत एकूण 159741 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 136657 133615 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
184 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 184 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १४८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६५ महिला व ८३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड येथील १८, अकोट येथील १५, मलकापूर येथील आठ, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी सहा, कौलखेड येथील पाच, बाळापूर येथील चार, आदर्श कॉलनी, घुसर, राजंदा ता.बार्शीटाकळी व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, शिवार, जीएमसी, बंजारा नगर, देगाव, सहकार नगर, बोरगांव मंजू, लक्ष्मी नगर, अलंदा, शिवसेना वसाहत, शिवणी, पैलपाडा, खडकी, केशव नगर, देशमुख फैल, न्यु तापडीया नगर, जठारपेठ व पिंजर बार्शीटाकळी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित रेल्वे कॉलनी, रिधोंरा, पंचशिल नगर, छोटी उमरी, म्हैसांग, नकासी, वाडेगाव, कानशिवणी, पाथर्डी ता.तेल्हारा, नया अंदुरा, हाता, निंबा, जयहिंद चौक, तारफैल,रामधन प्लॉट, सोपीनाथ पनगर, मालीपुरा, रामदासपेठ, खोलेश्वर रोड, बार्शीटाकळी, शिवनगर, रामनगर, तुकाराम चौक, आलेगाव ता.पातूर, खरप, खिरपूर, खुर्द, खेडकर नगर, जवाहर नगर, न्यु हिंगणा, रणपिसे नगर, मोठी उमरी, लहरिया नगर, हार्तूणा ता.बाळापूर, जूने शहर, गुडधी, हमजा प्लॉट, रायगड कॉलनी, येलवन व अकोट फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व २५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मोठी उमरी येथील चार, गोरक्षण रोड येथील तीन, रणपिसे नगर, राऊतवाडी, सिंधी कॅम्प, दाताळा व मिर्झापूर येथील दोन, तर उर्वरित लहान उमरी, सुकोडा, भागवत नगर, रेल्वे स्टेशन, पातूर, गुडधी, गोकूल कॉलनी, आनंद नगर, जठारपेठ, न्यु बस स्टॅण्ड, भनकपुरी, न्यु तापडीया नगर, गोयका नगर, कोकणवाडी, रेल्वे कॉलनी, सांगवामेळ, कुटसा, रेल व पिलकवाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल(दि.2) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 106 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी प्राप्त अहवालात 148, सायंकाळी प्राप्त अहवालात 36 तर रॅपिड चाचण्यात 106 असे एकूण 290 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
सहा जणांचे मृत्यू
दरम्यान आज सहा मृत्यूची नोंद झाली. त्यात त्यात मलकापूर, अकोला येथील ६५ वर्षीय महिला असून या महिलीस दि. २९ मार्च रोजी दाखल करण्यात आली होती, तर अन्य पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ७२ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते, निंबा ता.बाळापूर येथील ७५ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, जूने शहर, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. ३१ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच सायंकाळी दोघांचा मृत्यू झाला. त्यात बार्शीटाकळी येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २९ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य पिंपळखुटा ता.अकोट येथील ६० वर्षीय पुरुषांचा खाजगी रुग्णलयात मृत्यू झाला. त्यांना दि. २६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
593 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, अकोलाॲक्सीडेंट येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील नऊ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक, यकीन हॉस्पीटल येथील चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन हॉस्पीटल येथील सहा, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, आर्युवेदिक हॉस्पटल येथील तीन, बाईज हॉस्टेल अकोला येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, ओझोन हॉस्पीटल येथील सात, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ५२०, असे एकूण ५९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
4715 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 28565(23084+5304+177) आहे. त्यातील 468 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 23382 आहे. तर सद्यस्थितीत 4715 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.