• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास करतो म्हणून युवकाला मारहाण; चाकूनं भोकसून हत्येचा प्रयत्न

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 3, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास केलं म्हणून युवकाला मारहाण; चाकूनं भोकसून हत्येचा प्रयत्न
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास करतो, म्हणून एका युवकाला बेदम मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. आरोपी युवकांनी बस आडवून एका युवकाला खाली उतरवून जबरी मारहाण केली आहे. तसेच त्याच्यावर चाकूनेही हल्ला केला आहे. दरम्यान आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडणाऱ्या तरुणीलाही आरोपी युवकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत.

मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, संबंधित घटना कर्नाटक राज्याच्या मंगळुरू शहराच्या बाह्य परिसरात घडली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास काही लोकांनी बस आडवली आणि दुसऱ्या धर्माच्या युवतीसोबत प्रवास करणाऱ्या युवकाला खाली उतरवून त्याला जबरी मारहाण केली. विशेष म्हणजे संबंधित संबंधित युवक-युवती एकत्र शिक्षण घेत असून गेल्या काही वर्षांपासून ते दोघं एकमेकांना ओळखतात. पोलीस आयुक्तांनी पुढं सांगितलं की, या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी बंजरंग दलाशी जुडलेल्या अन्य चार जणांची नावं सांगितली आहेत. त्यांनी लवकरच अटक करू अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून आलेल्या आरोपींनी रात्री साडे नऊच्या एक बस आडवली. त्यानंतर संबंधित युवकाला बसच्या खाली उतरवून थेट मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पीडित तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये पीडित तरुण गंभीर जखमी झाला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

संबंधित मुलगी बंगळुरूला जात होती. तर तिचा मित्र तिची मदत करण्यासाठी तिच्यासोबत जात होता. संबंधित मुलीने सांगितलं की, पीडित मुलाला आपण गेल्या काही वर्षांपासून ओळखते. तसेच आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.

Tags: beats young man for travelling with girl of another religioncrime newsmarathi news
Previous Post

राज्यात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची शक्यता ?

Next Post

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, सहा जणांचा मृत्यू;184 पॉझिटिव्ह

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
चाचणी

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, सहा जणांचा मृत्यू;184 पॉझिटिव्ह

लस

ऑक्सिजन सिलेंडर, रेमडीसीवीर इंजेक्शन पुरेसे उपलब्ध,वाचा कुठे उपलब्ध ..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.