• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home शेती

जाणून घ्या वेस्ट डी कंपोजर कसे तयार करायचे व त्याचे महत्व

Team by Team
April 3, 2021
in शेती
Reading Time: 1 min read
126 1
0
जाणून घ्या वेस्ट डी कंपोजर कसे तयार करायचे व त्याचे महत्व
19
SHARES
907
VIEWS
FBWhatsappTelegram

हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे.

गाईच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात.

यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.

हेही वाचा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

संस्थेद्वारा पुरविलेल्या कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते.व या द्रावणा पासुन पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.

ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

साहित्य

वेस्ट डि कंपोजर
२ किलो गुळ
२०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
२०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

कसे बनवावे

ड्रममधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डि कंपोजर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमानानुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.

पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे. हेच द्रावण विरजन म्हणून 20लिटर एका ड्रम मधे टाकून त्यात 200लिटर पाणी व 2किलो गुळ टाकुन वरील प्रमाणे 5-7दिवसात तयार करा. अशा प्रकारे लाखो लिटर द्रावण तयार करता येते.

कसे वापरावे 

तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.

फवारणीसाठी

पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

बीज प्रक्रियेसाठी

१ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डि कंपोजर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक विषाणू व बुरशी पासून बचाव होतो.

शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी

अंदाजे १ टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डि कंपोजर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा व त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

महत्वाचे 

एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल. किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून पुढील ५ ते ७ दिवसात आपणास 2०० लिटर द्रावण तयार होऊ शकते.

आत्ता पाहूया “वेस्ट डीकंपोजर” मध्ये नेमके काय आहे. यात खालील चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत.

1) Cellulose degrading Bacteria .

याच्या नावातच याची अोळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक.
याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू.

हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता (कावुंट) या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे.

त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डि कंपोजर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे.

परंतु, पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे.

अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.

2) Xylan degrading Bacteria

आता जाणुन घेवुया Xylan (झायलान) म्हणजे काय?
सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू. वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्मजीवाणू म्हणजे Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. या मुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते.आछादनातील बायाेमासचे वेगाने ‘डि-कंपोज करुन पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा ‘डि-कंपोजर करते.

 3) PSB (Phosphorus solubilizing Bacteria)

दाेन अथवा तिन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळाना देते.

4)KSB (Potash solubilizing Bacteria)

मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळाना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा ‘डि-कंपोजर करते. तसेच बुरशी नाशक व किटकनाशक म्हणुनही याचा वापर करु शकताे. या सर्व गुणा मुळेच वेस्ट डि-कंपोजर शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे.
धन्यवाद

शरद केशवराव बोंडे
जैविक शेतकरी
९४०४०७५६२८

Tags: how to create waste decomposerwaste decomposer
Previous Post

निराधारांना मिष्ठान्न देवून वाढदिवस साजरा,सामाजिक कार्यकर्ते वैभव बोळे यांचा उपक्रम

Next Post

लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय मजुर सोडतायत मुंबई, रेल्वे स्थानकात गर्दी

RelatedPosts

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
शेतकऱ्याला
Featured

शेतकर्‍यांना नववर्षाची भेट..! ‘डीएपी’ खताची पिशवी फक्त 1,350 रुपयांना मिळणार

January 2, 2025
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?
Featured

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?

October 11, 2024
लवकरच शेतकरी करतील विजेची शेती! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपलातून कल्पना
Featured

लवकरच शेतकरी करतील विजेची शेती! उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपलातून कल्पना

September 13, 2024
पंतप्रधान किसान योजन
Featured

जय किसान..! कृषी क्षेत्रासाठी १४ हजार कोटींच्‍या निधीला मंजुरी

September 2, 2024
Next Post
लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय मजुर सोडतायत मुंबई, रेल्वे स्थानकात गर्दी

लॉकडाउनच्या भीतीने परप्रांतीय मजुर सोडतायत मुंबई, रेल्वे स्थानकात गर्दी

शिक्षणमंत्र्यांचे आदेश : फी वसुलीसाठी तगादा लावणा-या शाळांची होणार चौकशी

ब्रेकिंग! राज्यातील बोर्डाच्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.