अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2399 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2181 अहवाल निगेटीव्ह तर 218 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 628 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 99 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 28275(22900+5198+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 158797 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 156174, फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2244 नमुने होते. आजपर्यंत एकूण 158696 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 135796 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
218 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 218 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १७४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६३ महिला व १११ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील ३२, पातूर येथील ११, तेल्हारा येथील नऊ, डाबकी रोड व खडकी येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, कौलखेड, सांगावा मेळ,पारस व बाळापूर येथील प्रत्येकी चार, वनी वेताल ता.अकोट,गोरक्षणरोड, आदर्श कॉलनी, देशमुख फैल, मलकापूर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, न्यु तापडीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी, टिटवा, कान्हेरी, कवथा सोपीनाथ व समित्रा हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कावरामा सोसायटी, सहकार नगर, दुर्गा चौक, तुकाराम चौक, हरिहर पेठ, निंभोरा, महसूल कॉलनी, जूने शहर, शेलार फैल, रेणूका नगर, जामठी बु., दगडपारवा, जामकेश्वर, रंभापूर, दानापूर, अडगाव, महागाव बु., आनंद नगर, कैलास टेकडी, अकोली जहाँगीर, कान्हेरी गवळी, घुसर, शिवसेना वसाहत, गजानन नगर, गायगाव, वरोडी, नागद, कृषी नगर, वनी धोरार्डी, कपिला नगर, तापडीया नगर, कुटसा, लहान उमरी, तरोडा, खोलेश्वर, दगडीपूल, केशवनगर, आळशी प्लॉट, खेडकर नगर, गिता नगर, टेलीफोन कॉलनी, समता नगर, स्टेशन एरिया, घुंगसी, तहसिल ऑफीस, डीएचडब्लू, जवाहर नगर, जहाँगीर, गोरेगाव, तुकाराम हॉस्पीटल, अकोट फैल, रामदासपेठ, भिमनगर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १३ महिला व ३१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील १४, महान व गाडेगाव कोर्ट येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा येथील चार, तळेगाव बाजार येथील तीन, बांगरगाव ता.तेल्हारा येथील दोन, तर उर्वरित राजूरा ता.अकोट, खिरकुंड बु. ता.अकोट, बाळापूर, हिवरखेड, वरखेड, झोडगा, मालेगाव ता.तेल्हारा, खोपडी ता.बार्शीटाकळी, पुनोती, अंजनी व राजंदा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल(दि.1) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 99 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी प्राप्त अहवालात 174, सायंकाळी प्राप्त अहवालात 44 तर रॅपिड चाचण्यात 99 असे एकूण 317 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
चार जणांचे मृत्यू
दरम्यान आज चार मृत्यूची नोंद झाली. त्यात रामदासपेठ, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ३१ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य भेंडी महल, ता.बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी खाजगी रुग्णालयातून दोघांचा मृत्यू झाला. त्यात उमरा ता.अकोट येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २७ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य कौलखेड, अकोला येथील ६९ वर्षीय पुरुष असून त्यांना दि. १३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
628 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, हॉटेल रिजेन्सी येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील सहा, अकोल ॲक्सीडेंट येथील दोन, खैर उम्मत हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बाशीटाकळी येथील सात, आर्युवेदिक हॉस्पीटल येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील तीन, बाईज हॉस्टेल येथील ११, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, स्कायलार्क हॉटेल येथील चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील तीन, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील ५४०, असे एकूण ६२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5024 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 28275(22900+5198+177) आहे. त्यातील 462 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 22789 आहे. तर सद्यस्थितीत 5024 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.