ओडिशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरने गुगल सर्च करून एका सहा महिन्यांच्या बाळाला इंजेक्शन दिले आणि त्यात या बाळाचा मृत्यू झाला आहे.
ओडिशाच्या डाबुगम जिल्ह्यात प्रशांत बोसियी आणि अमृता बिसोयी यांच्या 6 महिन्यांच्या बाळाची तब्येत बिघडली. 30 मार्च रोजी या दाम्पत्याने आपल्या बाळाला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपस्थि डॉक्टरने बाळाला तपासले. नंतर मोबाईलवरून गुगल वर काही सर्च केले आणि त्यातून पाहून प्रशांत यांना औषधे आणि इंजेक्शन लिहून दिले. प्रशांत यांनी इंजेक्श आणून दिले. डॉक्टरांनी ते इंजेक्शन बाळाला दिले. इंजेक्शन दिल्यानंतर बाळाने डोळे मिटले आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
पण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. बाळाला न्युमोनिया झाला होता. बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा त्याची तब्येत खालवली होती. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्यात यश नाही आले असे अधिकार्यांनी नमूद केले.