New ITR Form : प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आयटी रिटर्न (ITR) फॉर्मला नोटिफाय केले आहे. केंद्रीय कर मंडळाने (CBDT) ही माहिती दिली आहे. (CBDT)ने म्हटले आहे की कोरोना साथीच्या आणि करदात्यांची सोय लक्षात घेऊन नवीन आयटीआर फॉर्म जुन्या स्वरूपाच्या तुलनेत फारसा बदलेला नाही. प्राप्तिकर अधिनियम 1961 मधील दुरुस्तींमुळे केवळ काही आवश्यक बदल ठेवले गेले आहेत.
नवीन आयटीआर फॉर्ममध्ये फारसा बदल नाही
आयकर रिटर्न्स Income Tax returns फॉर्ममध्ये करदात्यांनाही विचारले गेले आहे की, ते नवीन कर प्रणाली (New Tax Regime) स्वीकारतील की जुन्या जुनीच पुढे चालू ठेवतील. मागील वर्षाच्या तुलनेत आयटीआर दाखल करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झाला नसल्याचे सीबीडीटीने नमूद केले आहे. नवीन आयटीआर फॉर्म https://incometaxindia.gov.in/Pages/downloads/income-tax-return.aspx या लिंकवर मिळेल.
ITR-1, ITR-4 कोणासाठी
ITR-आयटीआर फॉर्म 1 (Sahaj)आणि ITR-4 फॉर्म (Sugam) हे वापरण्यासाठी सर्वात सोपे फॉर्म आहेत. याचा जास्त वापर छोटे आणि मध्यम करदाते करतात. Sahaj फॉर्म जे भरतात ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे, ज्यांचे उत्पन्न केवळ पगार, एक घराचे व्याज अशा स्त्रोतासारखे आहे. सुगम (Sugam)फॉर्म जे लोक, हिंदू अविभाजित कुटुंबासाठी (HUF)आहे आणि ज्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि व्यवसाय किंवा कोणत्याही व्यवसायातून मिळणारे उत्पन्न असते.
अशा प्रकारे ITR फॉर्म निवडा
1- जी वैयक्तिक आणि हिंदू अविभाजित कुटुंबे यांचा व्यवसाय हा व्यसायिक नसतो. (Sahaj भरण्यास पात्र नाहीत) ते ITR -2 भरु शकतात.
2- ज्यांचे उत्पन्न व्यवसाय किंवा व्यवसायाचे आहे ते आयटीआर-3 फॉर्म भरु शकतात
3- व्यक्तींव्यतिरिक्त, हिंदू अविभाजित कुटुंबे आणि भागीदारी संस्था, एलएलपी या सारख्या कंपन्या IYTR-5 फॉर्म भरु शकतात.
4- कंपन्या ITR फॉर्म -6 भरु शकतात.
5- आयकर कायद्यांतर्गत सूट मागणारे विश्वस्त, राजकीय पक्ष आणि सेवाभावी संस्था आयटीआर फॉर्म-7 भरु शकतात.
2.62 लाख कोटी परतावा
प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department)आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2.38 कोटी करदात्यांना परतावा म्हणून 2.62 लाख कोटी जाहीर केले आहेत. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 दरम्यान हा परतावा आहे. यात वैयक्तिक आयकर प्रकरणात 2.34 कोटी करदात्यांना, 87,749 कोटी रुपये परत करण्यात आले, तर कंपनी कराच्या प्रकरणात 3.46 लाख प्रकरणांमध्ये 1.74 लाख कोटी रुपये परत केले गेले. यापूर्वी, 2019-20 मध्ये एकूण 1.83 लाख कोटी रुपयांचा कर परतावा देण्यात आला.