तेल्हारा (पंकज भारसकळे)– तेल्हारा तालुक्यातील अटकळी हे छोटेसे गाव असून या गावातील सर्वच शेतकरी हे नेहमीचे पिके घेतात मात्र पदवीधारक संदीप प्रल्हाद दारोकार याला अपवाद ठरले त्यांनी कपाशी,हरभरा,तूर ,गहू,ज्वारी आदी शेती पिकाच्या पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीर शेती केली विशेष बाब म्हणजे पदवीधारक युवकाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न लागल्याने या नैराश्यात न राहता तथा कोणत्याही व्यवसाय न राहता आपल्या वडिलोपार्जित असलेली 8 एकर शेती पैकी 2 एकर शेतीत वडील माजी मुख्याध्यापक प्रल्हाद आकोशी दारोकार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मेहनतीने 60 दिवसाच्या रात्रंदिवस वन्यजीवा पासुन रक्षणकरुन कोथिंबीर लागवड करून कोथिंबीर पीक फुलविले आहे त्यामुळे आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे विविध सन,उत्सव,लन्ग सोहळे हे होत आहेत कोथिंबीर ची मागणी सुद्धा वाढती आहे याचं बाबी वर लक्ष देत या पदवीधारक युवा शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबाच्या व पत्नीच्या शारदा संदीप दारोकार मदतीने कोथिंबीर शेती फुलविली आहे त्यामुळे या शेतीचे सम्पूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे त्यामुळे शिक्षण हे नोकरी लागण्यासाठीच नसून तर ते शेतीला वेगळया पद्धतीने फुलविण्यासाठी सुद्धा वापरता येते असे मुलाखती दरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या
कोथिंबीर पिकासाठी लागलेला कालावधी 60 दिवसांचा
आलेला एकूण खर्च 20,000 हजार रुपये
अपेक्षित उत्पन्न 2,00000
मी पारंपरिक शेतीला फाटा देत कोथिंबीर पिक घेतले आहे मार्केट मध्ये भाव चढता झाल्यास नक्कीच फायदा होईल त्यामुळे नोकरी न लागत असलेल्या युवकांनी नैराश्यात नराहता शेती कडे वळावे
संदीप दारोकार
पदवीधारक युवा शेतकरी अटकळी