अकोला : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1279 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1109 अहवाल निगेटीव्ह तर 170 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 698 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 88 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 27958(22682+5099+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 156423 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 153804, फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2240 नमुने होते. आजपर्यंत एकूण 156297 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 133615 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
170 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 170 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी १४९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ४५ महिला व १०४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २४, पातूर येथील नऊ, मोठी उमरी येथील सहा, अडगाव, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, बार्शीटाकळी, गोरक्षणरोड व एमआयडीसी येथील प्रत्येकी चार, अडगाव खु., कौलखेड, मलकापूर, गंगा नगर, सुधीर कॉलनी, वणीरंभापूर, रतनलाल प्लॉट व उमरी नाका येथील प्रत्येकी तीन, रईखेड, हिवरखेड, बायपास रोड, डाबकी रोड, पारस, लहान उमरी, सिंधीकॅम्प, भिकूनखेड व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित उन्नती खुर्द, विवरा, बेलुरा, कुटासा, आसेगाव बाजार, ऐदलापूर, नव्हेरी खुर्द ता.अकोट, चिंतलवाडी, गाडेगाव, हिंगणी बु., महागाव बु., खरप रोड, विजयनगर, पोलिस लाईन, जीएमसी, ताजनगर, आळशी प्लॉट, आदर्श कॉलनी, आपातापा रोड, राधाकिसन प्लॉट, नया अंदुरा, उरळ बु., शंकर नगर, खापरखेडा, चैतन्यवाडी, हेडक्वॉटर, यावलकरवाडी, खदान, निपाणा, रिधोरा, अंदाज सावगी, खैर मोहमद प्लॉट, भौरद, लोणी, खोलेश्वर, गाडगे नगर, गड्डम प्लॉट, अनिकट, गिता नगर, कंळबेश्वर व समता नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील चार, बाळापूर व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवर, एमआयडीसी, दुर्गा चौक, रेणूका नगर, गुलजार घाट, घुसर, आपातापा, गुन्हे अन्वेषक विभाग, सस्ती वाडेगाव, विजय नगर, रामदासपेठ, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल(दि.31) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 88 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी प्राप्त अहवालात 149, सायंकाळी प्राप्त अहवालात 21 तर रॅपिड चाचण्यात 88 असे एकूण 258 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
पाच जणांचे मृत्यू
दरम्यान आज पाच मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंडगाव ता.अकोट येथील ८६ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर आज सायंकाळी चार मृत्यूची नोंद झाली. त्यात डाबकी रोड, अकोला येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य तारफैल, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, शिवापूर अकोला येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर गोरक्षण रोड, अकोला येथील ८३ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास दि. २१ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
698 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३३, युनिक हॉस्पीटल येथील सात, हॉटेल रिजेन्सी येथील चार, नवजीवन हॉस्पीटल येथील चार, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील सात, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन, हारमोनी हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील पाच, आर्युवेदिक महाविद्यालयातून दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, इंद्रा हॉस्पीटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, तर होम आयसोलेशन येथील ६२० जणांना असे एकूण ६९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
5339 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 27958(22682+5099+177) आहे. त्यातील 458 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 22161 आहे. तर सद्यस्थितीत 5339 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.