न्यूयाॅर्क : वयाच्या ७ व्या वर्षी मुलं आपल्या सवंगड्यांसोबत खेळण्यात, आई-वडिलांसमोर हट्ट करण्यात आणि आपल्या विश्वात रमण्यात वेळ घालवितात. पण, अमेरिकेत एका ७ वर्षांच्या मुलाने चक्क बलात्कार केला आहे, असा खटला पीडितेने दाखल केलेला आहे. या बातमीने अमेरिकेत आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
७ वर्षांच्या चिमुरड्याने बलात्कार केल्याची घटना ही न्यूयाॅर्क शहरात घडलेली आहे. पहिल्यांदा २६ नोव्हेंबर या दिवशी मुलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. आता २३ मार्चला या मुलावर खटला दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील पीडितेचं नाव, तिचं वय, यासंबंधीची माहिती पोलिसांनी देण्यात नकार दिला आहे.
या ७ वर्षांच्या चिमुरड्यावर कौटुंबिक न्यायालयात चक्क खटला चालविणार जाणार आहे. न्यूयाॅर्क शहराचे एटर्नी एन्थनी यांनी या घटनेवर विश्वास ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इतका लहान मुलगा बलात्कार कसा काय करू शकतो. अशाने त्या मुलाचं भविष्य खराब होऊ शकते. त्याच्यावरील बलात्काराचा आरोप सिद्ध करावा लागेल. त्यात त्या ७ वर्षांच्या मुलाला मानसिक त्रास सहन करावा लागेल, असंही एन्थनी म्हणाले आहे.