दुबई : आपलंही पिळदार शरीर सर्वांना मोहीत करून टाकावं, सर्वांनी आपल्याकडे एकटक पाहावं, असं कुणा पुरुषाला वाटत नाही? त्यामुळे तासंतास जिममध्ये व्यायाम करणारी पिढी आपण पाहतो आहे. मात्र, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केली की, अंगलट येते, इतकंच नाही तर, जीवावरही बेततं. अशीच एक घटना दुबईमधल्या एका बिल्डरच्या बाबतीत घडली आहे. जीव जाता जाता वाचला आहे.
दुबईतील रॉयन क्रॉली बेंच प्रेस एक्सरसाइझ करत होता. रॉयनने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्याच्या जीवावर बेतता बेतता राहिला. वजन उचलत असताना रॉयनचं वजनावरील नियंत्रण सुटलं आणि त्याच्या उजव्या हाताचे मसल फाटले. रॉयनचे जीम ट्रेनर लॅरी व्हिल्स यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पाहून आपल्या लक्षात येतं की, बेंच प्रेस करताना रॉयन वरच्या दिशेने वजन नेत होता. रॉयनवर वजनाचा भार पडू नये, यासाठी त्याचा ट्रेनर मदत करत होता. पण तरी रॉयनच्या उजव्या हातावर ताण आला आणि त्याचे नियंत्रण सुटलं. तेव्हाच त्याच्या उजव्या हाताचे मसल फाटले. त्यावेळी त्याला तीव्र वेदना झाल्या. रायन वेदनेने अक्षरश: कळवळला. वेदनेने ओरडतच तो तिथून उठला. मिळालेल्या माहितीनुसार राययने तब्बल १८० किलोचं वजन उचललं होतं.
रॉयनला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. काही कारणामुळे त्याला सर्जरी करण्यासाठीदेखील त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे जमवले. रॉननचा कोच लॅरीने क्राऊड फंडिंगच्या मदत मागितली. रॉयनसाठी तब्बल २७ लाख रुपये जमवले. रॉयनची यशस्वी सर्जरी झाली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर याची माहिती दिली. फक्त एक तासाची सर्जरी होती पण त्यासाठी चार तास लागले. सर्जरी आधी मला खूप भीती वाटली होती. बॉडी बिल्डिंगचं करिअर सुरू होण्याआधीच संपतं की काय असंच वाटू लागलं.