भिंड (मध्यप्रदेश) : प्रेमासाठी वाट्टेल ते… म्हणत मध्यप्रदेशमधील भिंड गावातील एका महिलेने नणंदेच्या पतीसोबत पळून जाऊन संसार करण्याचा विचार पक्का केला. पण अडचण ठरणाऱ्या सासरच्या लोकांचा काटा काढण्यासाठी चक्क ९ लोकांच्या जेवणात विष घातलं आणि नणंदेच्या पतीसोबत घरातून धूम ठोकली. महिलेच्या आणि तिच्या प्रियकराविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेशातील भिंड गावात रेश्मा नावाची महिला आपल्या सासरच्या लोकांसोबत राहत होती. यापूर्वी रेश्माच्या पतीचं निधन झालेलं होतं. त्यामुळे सासरच्या लोकांनी लहान दिरासोबत रेश्माचे लग्न लावून दिलं. मात्र, कालांतराने रेश्मांचं नणंदेच्या पतीसोबत म्हणजेच लोहकन खानसोबत प्रेम जडलं. एकत्र कुटुंब असल्याने प्रेमाला चांगलेच धुमारे फुटाले. त्यांचं प्रेम खूप पुढे गेलं. एकत्र राहण्याचा दोघांचा विचार पक्का झाला.
परंतु, या प्रेमाला सासरच्या लोकांची आडकाठी होती. यांच्यामुळे आपलं प्रेम पुढे सरकणार नाही, तर सासरच्या लोकांची अडचण कशी दूर करायची, या विचारात लोहकन आणि रेश्मा होते. दोघांनी मिळून एक खतरनाक प्लॅन तयार केला. प्लॅन जबरदस्त असा होता की, सासरच्या सर्व लोकांच्या जेवणात विष टाकायचे आणि त्यांनी यमसदनी धाडायचे. प्लॅन सक्सेस झाली की, आपण दोघेही स्वतंत्र झालो अन् दोघे मिळून लग्न करू आणि संसार करू.
जेवणात विष कालविण्याची जबाबदारी रेश्माने स्वीकारली. योग्य वेळेची वाट पाहत बसलेल्या रेश्माने संधी साधून सासरच्या लोकांच्या जेवणात विष घातले. यामुळे घरातील सुमारे ९ सदस्य बेशुद्ध पडले. त्याचा फायदा घेऊन रेश्मा आणि लोहकनने घरातून धूम ठोकली. बराच वेळ घरातून काही हालचाल झाली नाही म्हणून शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. तर, हा सगळा प्रकार समोर आला.
शेजाऱ्यांनी पोलिसांकडे घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घरातील बेशुद्ध झालेल्या लोकांनी रुग्णालयात हालविले. पण, सर्व जण गंभीर असल्याने त्यांना ग्वाल्हेरला हलविण्यात आले. अजूनपर्यंत रेश्मा आणि लोहकन यांचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.