• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सख्ख्या भावांची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचे आई-वडिलांचे दुर्देवी नशिब

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
79 1
0
सख्ख्या भावांची एकाच वेळी अंत्ययात्रा पाहण्याचे आई-वडिलांचे दुर्देवी नशिब
12
SHARES
570
VIEWS
FBWhatsappTelegram

वडेल (जि.नाशिक) : हर्षल व रितेशच्या आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले. हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर, रितेश मालेगाव येथे बारावीत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मुलाची संसाराला मदत होईल व कष्टातून उभा केलेला संसार फुलेल, असे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या आई-वडिलांचा टाहो काळीज हेलावणारा होता.

 

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दोन सख्ख्या भावंडाची एकत्रच अंत्ययात्रा
अजंग येथील इंदिरानगर परिसरातील देवीदास जाधव यांची मुले हर्षल (वय २२) व रितेश (१८) बुधवारी निमशेवडी येथे मित्राच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाहानंतर तेथून जवळच असलेल्या विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणाजवळ हे दोघे भाऊ गेले. त्या वेळी धरणावर असलेल्या सुरकुंडीवरून रितेशचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडून बुडत असताना, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात हर्षलनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. विराणे, लुल्ले, निमशेवडी, गरबड व परिसरातील गावांत ही माहिती पोचताच तेथील नागरिकांनी धरणाकडे धाव घेऊन दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दोघा भावांचा मृत्यू झाला होता. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे व सहकारी तपास करीत आहेत.

 

वडेल पंचक्रोशीत हळहळ

अजंग (ता. मालेगाव) येथील दोन भावांचा विराणे शिवारातील बोरी नदीवरील धरणात बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता. २४) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोघा सख्ख्या भावांच्या मृत्यूमुळे वडेल पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरा दोघांवर अजंग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

भाऊ आम्ही आता कोणासाठी जगू?
हर्षल व रितेशच्या आई-वडिलांच्या आर्त टाहोने उपस्थितांचे डोळे पाणावले. हर्षल नाशिकला एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकत होता. तर, रितेश मालेगाव येथे बारावीत होता. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर मुलाची संसाराला मदत होईल व कष्टातून उभा केलेला संसार फुलेल, असे सोनेरी स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या आई-वडिलांचा टाहो काळीज हेलावणारा होता. दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हर्षल व रितेशचे वडील एका संस्थेत शिक्षक असून, बरीच वर्षे विनाअनुदान तत्त्वावर काम करताना केशकर्तनाचा परंपरागत व्यवसाय करीत कुटुंबाची गुजराण ते करत होते. त्यातून, त्यांच्या संसाराची आता कुठे घडी बसली होती. त्यातच काळाने अचानक घाला घातल्याने जाधव कुटुंबीय उन्मळून पडले आहे. दोन्ही कर्ती मुले गमावल्याने श्री. जाधव व त्यांच्या पत्नीचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. अजंग ग्रामस्थही या दुर्घटनेने सुन्न झाले आहेत.

Tags: marathi newstwo brothers died by drowning
Previous Post

परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला

Next Post

पॅन ‘आधार’ला लिंक मुदतीसाठी राहिले फक्त सहा दिवस अन्यथा…

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
घरबसल्या फक्त १० मिनिटात मिळवा पॅन कार्ड! ‘अशी’ आहे online अर्ज करण्याची पद्धत

पॅन 'आधार'ला लिंक मुदतीसाठी राहिले फक्त सहा दिवस अन्यथा...

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग; हा मॉल घोटाळ्याचा महाल, शापित प्रॉपर्टी

मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग; हा मॉल घोटाळ्याचा महाल, शापित प्रॉपर्टी !

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.