• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सोलापुरात ऑक्सिजन टॅंक स्फोटात दोघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, आरोग्य, गुन्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
सोलापुरात ऑक्सिजन टॅंक स्फोटात दोघांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप, रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले
12
SHARES
559
VIEWS
FBWhatsappTelegram

सोलापूर : सोलापुरातील श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सीजन च्या टाकीचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. रात्री 11 च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या दोन टाक्यांपैकी एका टाकीचा स्फोट झाला. स्फोटात झालेल्या घटनेदरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. मृतामध्ये एक रुग्ण आणि एका रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूस ॲक्सिजन टॅंकचा स्फोटच कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. रुग्णाची परिस्थिती आधीच खालावलेली असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

यातील एक मृत सुनील लेंगारे हे पोस्ट कोव्हिड उपचारासाठी सोलापूरच्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची प्रकृती आधीपासूनच खालावलेली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे कालच या घटनेशी याचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण देखील रुग्णालय प्रशासनाने दिले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या आईला डबा देण्यासाठी आलेले हनुमंत शिरसागर यांचा देखील या घटनेदरम्यान मृत्यू झाला. स्फोटाच्या वेळी हनुमंत शिरसागर हे आपल्या आईला डबा देऊन रुग्णालय परिसरामध्ये बसले होते. त्यावेळी ऑक्सिजन त्यांचा स्फोट झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला. बेशुद्ध अवस्थेत त्यांना यास रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूस प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईक मदन क्षीरसागर यांनी केला. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. दरम्यान मृत हनूमंत शिरसागर यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी दिली.

टाकीचा स्फोट झाल्यानंतर संपूर्ण रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात टाकीतील केमिकलयुक्त पावडर पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली. दरम्यान टाकीचा स्फोट नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही. प्राथमिकदृष्टया केमिकल रिॲक्शनमुळे टाकीचा स्फोट झाला असण्याची शक्यता अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी व्यक्त केली होती.

रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये दोन मोठ्या टाक्या आहेत. त्यापैकी एक टाकी मागील काही दिवसांपासून बंद होती. तर दुसऱ्या टाकीतून रुग्णालयास ऑक्सीजन पुरवठा सुरु होता. बंद असलेल्या टाकीमध्ये अचानक ठिणगी येत असल्याचे काही जणांनी पाहिले. मात्र कोणालाही माहिती कळवण्याआधीच भीषण असा स्फोट झाला. प्लांटच्या बाजूला रुग्णांच्या नातेवाईंकासाठी प्रतिक्षालय आहे. या ठिकाणी असलेल्या अनेकांना याचा धक्का बसला. मागील बाजूस असलेल्या दरवाजाने या ठिकाणातील सर्व नागरिक बाहेर पळून आले. मात्र या स्फोटामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी टाकीत असलेली केमिकलयुक्त पावडर सर्वत्र पसरली होती. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात साफसफाईचे काम सुरुच होते.

या घटनेची माहिती मिळताच अग्मिशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली. पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे यांच्यासह परिसरातील नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची पाहणी केली. स्फोटामुळे रुग्णांचे नातेवाईक घाबरलेल्या परिस्थितीत होते. मात्र अधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन सर्व रुग्णांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली.

स्फोट झालेल्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या एका वॉर्डात केमिकलयुक्त पावडर मोठ्या प्रमाणात पसरल्याने तेथील रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर देखील उपचार केले जातात. दरम्यान हा प्रकार नेमका कशामुळे घडला? सुरक्षेच्या नियमांचे पालन होत होते का याची चौकशी करुन जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करु असा इशारा पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला.

Tags: explosion in solapur hospitalmarathi newsoxygen tank explosionShree Markandey Co-operative Hospital
Previous Post

जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे लसीकरण करण्याची मागणी

Next Post

अकोला: 238 पॉझिटिव्ह, 364 डिस्चार्ज, एकाचा मृत्यु

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Next Post
corona

अकोला: 238 पॉझिटिव्ह, 364 डिस्चार्ज, एकाचा मृत्यु

Acid attack

गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.