गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महत्वाच्या मंत्र्यांचे फाेन टॅप आहेत. या टॅपींग प्रकरणातून मंत्र्यांची सविस्तर माहिती गाेळा करुन संबंधित माहिती प्रसिद्धी माध्यमांना पूरविण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केले जात असल्याची शंका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा डाव भाजपने चालविला आहे असेही आमदार शिंदेंनी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना नमूद केले.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महत्वाच्या मंत्र्यांची माहिती माध्यमांपर्यंत पाेचवली जात आहे. ही माहिती पाेचविण्यासाठी फाेन टॅप केले जात असण्याची दाट शक्यता आहे. भाजप केंद्रीय यंत्रणेचे वापर करुन महाविकास आघाडीमधील फाेन टॅप करत आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आमदार शिंदे म्हणाले संजय राठाेड, धनंजय मुंडे आणि आता अनिल देशमुख यांची प्रकरण आपल्या सर्वांच्या समाेर आली आहेत. ही प्रकरणे भाजपच्या केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने फाेन टॅप करुन त्यातून माहिती गाेळा करणे आणि संबंधित माहिती माध्यमांना देणे आणि राज्य सरकारला बदनाम करणे हा प्रकार सुरु आहे.
खरंतर राज्य सरकराने ही बाब आता गांभीर्याने घ्यावी. जे माहिती पाेहाेचवत आहेत त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे आमदार शिदेंनी नमूद केले. मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मालमत्तेची देखील चाैकशी झाली पाहिजे असेही शिंदेनी सांगितले. ते म्हणाले सिंग यांनी न्यायालयात स्वतःच्या बदली संदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यात रश्मी शुकला यांनी काही दिवसांपुर्वी राज्य सरकारमधील मंत्री पाेलिसांच्या बदल्या करण्यासाठी पैसे घेत असल्याचा आराेप केला आहे. रश्मी शुक्ला यांनी एका अहवालात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला असल्याचं नमूद करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या काळात असा अहवाल समोर आला असेल तर त्यांनी त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. त्यांना कारवाई पासून कोणी अडवले होतं असा प्रश्न उपस्थित करुन आमदार शिंदे म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.