अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1704 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1364 अहवाल निगेटीव्ह तर 340 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 300 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 25514(21128+4209+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 146834 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 144269, फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2186 नमुने होते. आजपर्यंत एकूण 146647 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 125519 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
340 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 340 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी 262 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 60 महिला तर 202 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात तेल्हारा येथील 38, डाबकी रोड येथील 21, हसनपूर व हिवरखेड येथील प्रत्येकी 10, पाथर्डी, जुने शहर, गुरुदेव नगर, अकोट, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी पाच, आडगांव, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, गजानन नगर, गणेश नगर येथील प्रत्येकी चार, आडगांव बु., हमजा प्लॉट, मोठी उमरी, घुसर, व्याळा, हता, हिवरा कोरडे, रसुलपूर, अकोट फाईल येथील प्रत्येकी तीन, धारुडे, गुलजारपुरा, बार्शीटाकळी, आगरवेस, भारती प्लॉट, राजेश्वर नगर, कलेक्टर कॉलनी, अनीकट, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पळसो, बोरगांव मंजू, करंजा राम येथील प्रत्येकी दोन तसेच उर्वरित रुईखेड, भिमनगर, शिवाजी नगर, गाडगे नगर, भांडपूरा, मारोती नगर, भिरडवाडी, पोळा चौक, जाजू रेल्वे गेट, वाशीम बायपास, गंगा नगर, जयहिंद चौक, महाकाली नगर, बालाजी नगर, गायत्री नगर, लोकमान्य नगर, बहूरत, खैर मोह. प्लॉट, शरीफ नगर, संकल्प नगर, कुंभारी, खडकीपुरा, रुपचंद नगर, वानखडे नगर, मेहरे नगर, रणपीसे नगर, गुडवाले प्लॉट, नागड, सुकोडा, शिव नगर, राम नगर, तुकाराम हॉस्पिटलच्या मागे, तुकाराम चौक, खडकी, बापू नगर, निंब वाडी, सिंधी कॅम्प, पी.के.व्ही. कॉलनी, निवारा कॉलनी, आदर्श कॉलनी, युमुना नगर, शिवनी, माळी पुरा, शिवर, डोंगरगांव, लाखोंडा बु., जी.एम.सी. होस्टेल, दही हांडा, पाटी, हातगांव, नवा आंदुरा, खर्डो, कुरमखेड, बटवारी, अकोली खुर्द, खदान, भरंडी महल, खोलेश्वर, नर्सिंग कॉलनी, बाळापूर रोड, वाशीम बायपास, बाभूळगांव, निपाणा, चित्रनगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ७८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ६० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बाळापूर येथील नऊ, चिखलगाव येथील सहा, विराहित येथील पाच, शिवर, न्यु तापडीयानगर, बार्शीटाकळी व मनब्दा येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, जूने शहर, गोरक्षण रोड, खडकी, सुकळी व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित आबेडकर नगर, अकोट फैल, आझाद कॉलनी, मोहमद पुरा, भरतपूर, कौलखेड, बाळापूर रोड,अशोक नगर, रतनलाल प्लॉट, कच्ची खोली, मोमीनपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बैद्यपुरा, डाबकी रोड, मुर्तिजापूर, आरोग्य नगर, बापू नगर, गिता नगर, खदान, तोष्णीवाल लेआऊट, ज्योती नगर, ऐश्वर्या नगर, अकोट, हातगाव ता.मुर्तिजापूर, देऊळगाव, व्याळा, सस्ती, हिरपूर, मोठीउमरी, जवाहर नगर, रणपिसे नगर, जठारपेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
काल(दि.23) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालालत 66 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात आरटिपीसीआरच्या सकाळी प्राप्त अहवालात 262, सायंकाळी प्राप्त अहवालात 78 तर रॅपिड चाचण्यात 66 असे एकूण 406 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
चौघांचा मृत्यू
दरम्यान आज चार जणांचा मृत्यू झाला. त्यात मोठी उमरी येथील 72 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या महिलेस दि. 14 रोजी दाखल करण्यात आले होते. तर आज सायंकाळी अकोट फैल, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २२ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य रुग्ण उमरा, अकोट येथील ६७ वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण रजपूतपुरा, अकोला येथील 36 वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. १६ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
300 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३४, देवसारा हॉस्पीटल येथील एक, अकोला ॲक्सीडेंट येथील सात, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी पाच, हारमोनी हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, हॉटेल स्कायलार्क येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातुन १७, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील एक, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, नवजीवन हॉस्पीटल येथील नऊ, ओझोन हॉस्पीटल येथील एक, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील पाच, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील एक, समाज कल्याण हॉस्टेल येथील २७, अकोट कोविड केअर सेंटर येथील पाच, यकीन हॉस्पीटल येथील दोन, बाळापूर कोविड केअर सेंटर येथील चार, इंद्रायणी हॉस्पीटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील १५२ जणांना असे एकूण ३०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
6067 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 25514(21128+4209+177) आहे. त्यातील 434 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 19013 आहे. तर सद्यस्थितीत 6067 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.