भारतात इलेक्ट्रीकवरील बाईक आणि कारला ग्राहक मोठ्यासंख्येने पसंती देत आहेत. एका बाजूला इंधनाचे दर गगनाला भीडले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा इलेक्ट्रीक वाहनांकडे कल वाढला आहे. अशाच परिस्थितीत भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी ‘डिटल’ने नुकतीच राइड एशिया एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर ‘डिटल इझी प्लस’ लाँच केली आहे. या इलेक्ट्रीक बाईकची किंमत ३९,९९९ रुपये असल्याचे समजते आहे.
दरम्यान, ‘डिटल इझी प्लस’ ही ई बाईक केवळ १९९९ रुपये देऊन कंपनीच्या वेबसाईटच्या माध्यमातून प्री-बुक केली जाऊ शकते. या बाईकमध्ये २५० डब्ल्यूची इलेक्ट्रिक मोटर आणि ४८ व्ही १२ एएच लीथियम आयन फास्फेट बॅटरी आहे. या बॅटरीला ६ ते ७ तासांत चार्ज केले जाऊ शकते. कंपनी बाईकसाठी २ वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देत असल्याचे समजते. ही वॉरंटी ४० हजार किमी पर्यंत वैध आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही बाईक सिंगल चार्जमध्ये ६० किमी पर्यंतची धावते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ही बाईक स्थिरतेची उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करते. बाईकची लोड कॅपिसिटी १७० किलो असून ग्राउंड क्लिअरन्स १७० एमएम आहे. बाईकचा सर्वाधिक वेग २५ एमएम आहे. ग्राहकांना ही बाईक ५ रंगामध्ये उपलब्ध आहे. याला मेटेलिक ब्लॅक, मेटेलिक रेड, मेटेलिक येलो, गनमेटल आणि पर्ल वाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता.
‘डिटल इझी प्लस’ या इलेक्ट्रिक बाईकच्या लॉन्चिंगबद्दल कंपनीचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया म्हणाले की, ‘डीटल हा लोकांसाठी एक स्वदेशी ब्रँड आहे. भारताची सर्वात विश्वसनीय लो-स्पीड दुचाकी निर्माता बनण्याचे आमचे ध्येय आहे. लोकांची दैनिक गरज भागवू शकेल, अशी बाईक आम्ही डिझाईन केली आहे. भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे ध्येय आम्ही डोळ्यांपुढे ठेवले आहे.’