अकोला(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तेल्हारा तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समित्यांच्या सर्कल निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून सदर पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकांमध्ये वंचितचाच झेंडा फडकाऊन चौदाही जिल्हा परिषदेच्या जागा ताब्यात घेण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धेंर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, जिल्हा परिषद गटनेते न्यानेश्वर सुलताने यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अकोला जिल्हा परिषदेमधील चौदा सदस्याचे सभासदत्व रद्द झाले तर अठ्ठावीस पंचायत समिती सदस्याचे सभासदत्व सुद्धा रद्द झाले आहे. तथा सर्वोच्च न्यायालयाने रिक्त जागेवर तात्काळ निवडनुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्कल निहाय दौरे लावून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे त्यानुषगाने तेल्हारा तालुक्यातील अडगाव,तळेगाव व दानापूर या जिल्हा परिषद सर्कल मध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकी घेण्यात आल्या यामध्ये तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेच्या व चार पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचाच विजय व्हावा यासाठी सर्कल बैठकांनचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून प्रदीप वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष धेंर्यवंर्धन पुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, ऍड.संतोष रहाटे,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे,जी प गटनेते न्यानेश्वर सुलताने,दिनकर खंडारे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई राठोड, कृषी सभापती पंजाबराव वडाळ,जिल्हा परिषद सदस्या मिराताई पाचपोर,मा.तालुका अध्यक्ष संदिप इंगळे,प्रसन्नजित गवई, विकास सदांशीव, प्रदीप शिरसाट पद्मा गवारगुरु यांच्यासह सुभाष रौदळे,गोपाल कोल्हे, प्रमोदिनी कोल्हे, संगीता लढाऊ,दीपमाला दामधर, रफत सुलताना, पंचायत समिती गटनेता संजय हिवराळे,सदस्य मो. इंद्रिसभाई यांची उपस्तीती होती.
सर्कल बैठकांमध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देऊन विविध योजनांचा लाभ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.