कोलकाता : वडिलांना पहिल्यांदा हाॅटेलमध्ये नेलं… नंतर पोट भरून जेवण खाऊ घातलं… त्यानंतर दारूदेखील मनसोक्त पाजली… नंतर फेरफटका मारण्यासाठी २२ वर्षांची मुलगी आणि तिचे ५६ वर्षांचे वडील फिरायला गेले. हुगळी नदीच्या काठावर वडील झोपलेले पाहून मुलीने झोपलेल्या वडिलांवर राॅकेल ओतले आणि जिवंत जाळले, ही धक्कादायक घटना रविवारी घडली.
वडिलांना झोपेतच जिवंत जाळण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली अन् संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीचे वडील हुगळी नदीच्या काळावर निवांत झोपलेले होते. ती संधी साधत तरुणीने वडिलांवर राॅकेल ओतले आणि जिवंत जाळले. पार्क सर्कसजवळील क्रिस्टोफर रोड येथे ही २२ वर्षीय तरुणी आपल्या वडिलासोबत राहत होती. तरुणीच्या नातेवाईकांनी घटनेची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दिली. त्यानंतर तरुणीला ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही पाहून घटनेचा धक्कादायक खुलासा झाला अन् तरुणीने वडिलांना जिवंत जाळल्याचे कबूल केले.
तरुणीने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, लहान असतानाच त्या तरुणीच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे घरात वडील आणि ही तरुणी राहत होती. अशावेळी वडील तिच्यावर वारंवार अत्याचार करत होते. नंतर तरुणीचे लग्न झाले. हा प्रकार बंद झाला. परंतुु, तिचा संसार जास्त काळ टिकला नाही. त्यामुळे ही तरूणी आपल्या घरी परतली. पुन्हा पुर्वीसारखाच प्रकार वडिलांकडून वारंवार होऊ लागला. शेवटी या प्रकाराला तरुणी वैतागली. तिने वडिलांना संपविण्याच प्लॅन केला.
बाहेर फिरण्याच्या विचाराने वडिल आणि मुलगी बाहेर पडले. एका हाॅटेलमध्ये वडिलांना मुलीने भरपूर खायला घातलं. इतकंच नाही तर त्यांना मनसोक्त दारूही प्यायला दिली. दोघेही जेवल्यानंतर नदीकिनारी फिरायला आहे. किनाऱ्यावर वडील झोपल्याचे पाहून तिने वडिलांच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले.