अकोला – काल दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1551 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1226 अहवाल निगेटीव्ह तर 325 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे दि.21 रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 24776(20553+4046+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 143819 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 141271 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2169 नमुने होते. आजपर्यंत एकूण 143714 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 123161 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
325 पॉझिटिव्ह
काल सकाळी २७१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७० महिला व २०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील महागाव येथील २९, बार्शीटाकळी येथील २५, डाबकी रोड येथील १५, तेल्हारा येथील ११, वाशिम बायपास व चहाचा कारखाना येथील प्रत्येकी सात, आदर्श कॉलनी, मोठी उमरी, खडकी, शिवसेना वसाहत व जिएमसी येथील प्रत्येकी सहा, कान्हेरी सरप, यशवंत नगर, अनिकट, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, मलकापूर, पावसाळे लेआऊट, कमला नगर प्रत्येकी चार, गिता नगर, आमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, शिवणी, केशव नगर, कौलखेड, बाबुळगाव, खदान व महाकाली नगर येथील प्रत्येकी तीन, माना, महान, कुगवा, नायगाव, गुरुदत्त नगर, अकोट फैल, शिवनगर, एमआयडीसी, अकोट, सस्ती, रणपिसे नगर, गणेश नगर, बोरगाव मंजू, रामदासपेठ, देशमुख फैल, शिवाजी नगर व गुडधी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अडगाव, बिहाड माथा, दगडपारवा, शिवापूर, आळंदा, राजंदा, गिरी नगर, तुकाराम चौक, राऊतवाडी, जठारपेठ, हरीहर पेठ, गुलशन कॉलनी, गंगा नगर, बाळापूर नाका, खैर मोहम्मद प्लॉट, व्याळा, गुलजारपुरा, अंबिका नगर, गणेश नगर, लोकमान्य नगर, म्हैसपूर, ओम मंगल कार्यालय, आगरवेस, रजपूतपुरा, सोनटक्के प्लॉट, अनखवाडी, देशपांडे प्लॉट, भागवत प्लॉट, फडके नगर, ज्योती नगर, गोंविद नगर, पातूर, जामठी, न्यु हिंगणा, चिखलगाव, न्यु राधाकिशन प्लॉट, जज क्वॉटर, आळशी प्लॉट, वानखडे नगर, दिपक चौक, गड्डम प्लॉट, सिव्हील लाईन, जूने शहर, कपिलवास्तू नगर, खेतान नगर, इनकम टॅक्स चौक, निमवाडी, पक्की खोली, लहान उमरी, गजानन पेठ, मोरेश्वर कॉलनी, जवाहर नगर, हसणापूर व वाडेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ५४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २० महिला व ३४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पिंजर येथील पाच, डाबकी रोड, खदान, तेल्हारा व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, संतोष नगर, सिंधी कॅम्प, पिंपळखुटा, निंबी, बार्शीटाकळी, गजानन नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मणात्री, हिंगणी, गोरक्षण रोड, खडकी, पंचशील नगर, कुरणखेड, बदलापूर, तारफैल, राऊतवाडी, वाडेगाव, राम नगर, रामदासपेठ, चतारी, तापडीयानगर, उमरदरी, राधे नगर, अकोट फैल, रिधोरा, अनंत नगर, वानखडे नगर, गुलजारपुरा, भिरडवाडी, जुना कापड बाजार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 42 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 271, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 54 तर रॅपिड चाचण्यात 42 असे एकूण 367 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
तिघांचा मृत्यू
दरम्यान आज तिघांचे मृत्यू झाले. त्यात बाळापूर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य जागृती विद्यालय, अकोला येथील रहिवासी असलेला ६७ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुर्तिजापूर येथील ७० वर्षीय पुरुष असून या पुरुषास दि. २० रोजी दाखल करण्यात आले होते.
405 जणांना डिस्चार्ज
दरम्यान काल दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५३, सहारा हॉस्पीटल येथील चार, अकोला ॲक्सीडेंट येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील सहा, युनिक हॉस्पीटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी नऊ, इंद्रा हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल अकोला येथील एक, नवजीवन हॉस्पीटल येथील एक, समाज कल्याण हॉस्टेल येथील सहा, तर होम आयसोलेशन येथील ३०७ जणांना असे एकूण ४०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
6183 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 24776(20553+4046+177) आहे. त्यातील 427 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 18166 आहे. तर सद्यस्थितीत 6183 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.