भांबेरी(योगेश नाईकवाडे)- भांबेरी येथील सामाजिक कार्यकर्ते रोशनभाऊ बोंबटकार हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचा इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहचवणारी तसेच अनेक बहुउद्देशिय कार्यात आघाडीवर असणाऱ्या महात्मा फुले ब्रिगेड संघटनेच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी म.फुले ब्रिगेड चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास जी महाजन यांच्या आदेशाने रोशन बोंबटकार यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती पत्रात प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटले आहे की, महात्मा फुले यांचे विचार आणि आचार यांच्यावर संघटनेची मूलतत्त्वे आधारलेली आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांचे कार्य,त्यांचे साहित्य, जनसामान्यांना वाचायला मिळावे,त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी संघटना काम करत आहे. हे कार्य आणखी वाढविण्यासाठी रोशन बोंबटकार यांनी प्रयत्न करावे तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रात चांगली क्रांती घडवून यावी यासाठी संघटना काम करत आहे. यामध्ये महिलांना आणि युवकांना आपली समाजामध्ये वेगळी छवी निर्माण करता यावी व प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय यासाठी संघटना अविरतपणे काम करत आहे.