जालंधर (पंजाब) : आपल्या कुंडीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी एका शिक्षिकेने आपल्याकडे ट्यूशनसाठी येणाऱ्या १३ लहान विद्यार्थ्याशीच प्रतिकात्मक लग्न केले. इतकंच नाही तर, लग्नाचे सर्व विधी-सोपस्कार पार पाडून हातात असणारा हिरवा चुडा फोडत विधवा झाल्याचे ढोंगदेखील केले. अंधश्रद्धेचा कळस गाठणारा हा प्रकार घडला आहे पंजाबमधील जालंधर या भागात. हा सगळा प्रकार घडल्यानंतर लहान मुलाला शिक्षकेने घरी सोडलं आणि घरी आल्यानंतर मुलाने घडलेली सर्व हकिकत घरात सांगितली. तेव्हा घरातील लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या लग्नाची चर्चा तर अख्ख्या गावात पसरली होती.
लहान मुलाच्या पालकांनी पोलिसांनी सांगितले की, बावा खेल परिसरात राहणाऱ्या या शिक्षिकेने त्यांच्या मुलाला आपल्या घरात ६ दिवसांसाठी कैद केले होते आणि त्याच्याबरोबर लग्नाचे ढोंग केले. त्या सहा दिवसांच्या दरम्यान, हळद-मेहंदीचे विधीदेखील करण्यात आले. इतकंच नाही तर, सुहागरात्रीच्या नियोजनाचे नाटकदेखील केले. त्यानंतर या तरुण शिक्षिकेने आपल्या हातातील चुडा फोडून विधवा होण्याचे नाटक रचले आणि अप्रत्यक्षपणे नवरा मेल्याचे दाखवून त्याच्या मृत्यूचेही नाटक केले. जेव्हा मुलगा घरी आला, त्याने हा सगळा प्रकार घरात सांगितला, घरातील लोक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा भटजीने मुलीच्या कुंडलीतील मंगळ दोष करण्यासाठी हे सर्व नाटक केलेले होते. याच्याने तुमच्या मुलाला काहीही होणार नाही, तेव्हा कुठे हे प्रकरण मिटले.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित शिक्षिकेच्या खासगी क्लासमध्ये १३ वर्षांचा मुलगा शिकण्यासाठी येत होता. तिच्या कुडंलीतील दोष करण्यासाठी तिच्या घरातील व्यक्तींनी तिचं प्रतिकात्मक लग्न करायचं ठरवलं. त्यावर या शिक्षिकेने मुलाच्या पालकांना सांगितले की, मी याला माझ्या क्लासमध्ये शिकवते आणि तुम्ही मला पैसेदेखील देऊ नका. त्याला माझ्याकडे काही दिवस राहू दे. मुलाच्या घरातील लोकदेखील मान्य झाले. इकडे शिक्षिकेच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली आणि लग्नही केले. लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर पती मेल्याचे ढोंग रचत हातातील चुडा फोडला.