अकोला :– राज्यातील सहा जिल्हा परिषदेतील 85 निवडणूक विभाग व त्याअंतर्गत 37 पंचायत समित्यांमधील 144 निर्वाचक गणातील रिक्त पदांच्या निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
तो याप्रमाणे – अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीकरीता तयार केलेल्या मतदार यादीवर हरकत व सूचना मागविणे दि. 5 एप्रिल, हरकती व सूचना दाखल करणाचा अंतिम दिनांक 12 एप्रिल, मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याचा दिनांक 20 एप्रिल, छापिल याद्या माहितीसाठी ठेवण्याची सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 20 एप्रिल, तर मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 27 एप्रिल.