तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार गुरव यांनी तहसीलदार पदाचा प्रभार आल्यानंतर वाळूमाफियांविरुद्ध अनेक कारवाया केल्या कारवायांमुळे त्यांना कधी दबंग तर कधी कर्तव्यदक्ष म्हटल्या गेले. मात्र यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात काही वाळूमाफियांवर कारवाई तर काहींना मुभा मिळत असल्याचे बोलल्या जात होते यामध्ये मोठा हप्ता मिळत असल्याने काहींवर कारवाई करीत असल्याचे तालुक्यातील सुज्ञ नागरिक बोलत आहेत आजपावोतो केलेल्या कारवाया पैशांसाठी की कर्तव्याप्रती असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.याप्रकरणात नेमक काय होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे
काय आहे नेमकी तक्रार वाचा सविस्तर
तेल्हारा तहसील कार्यालयातील मागील काळातील प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांनी रेती वाहतुकीसाठी वारंवार पैशाची मागणी करून तीस हजार रुपये प्रतिमहा प्रति ट्रॅक्टर स्वीकारून सुद्धा कायदेशीर रित्या वाहतूक पास असलेल्या वाहनावर कारवाई केल्याबाबत तसेच अवैध मार्गातून अतोनात संपत्ती गोळा केल्याबाबत निखिल बलराम सिंह ठाकुर राहणार माळेगाव बाजार यांनी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे तक्रार केली आहे .निखिल ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मी शेतीचा व्यवसाय करत असून माझ्याकडे ट्रॅक्टर आहे मी रीतसर रॉयल्टी पास विकत घेऊन नियमानुसार रेती विकत घेऊन ती लोकांच्या मागणीनुसार पुरवितो मागील चार महिन्यांपासून तेल्हारा तहसीलदार म्हणून राजेश गुरव हे काम पाहत आहेत यांनी रेती वाहतूक करणाऱ्या लोकांची त्यांचे मध्यस्थ आकाश बरींगे तसेच महसूल विभागातील कोतवाल विशाल बरींगे यांच्या माध्यमातून रुपये तीस हजार प्रतिमहा प्रति वाहन असा करार करून संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत रात्रीच्या कालावधीत कितीही वाहतूक करा तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असा निरोप पाठवून त्यांच्याकडून पैसे आकाश बरींगे व विशाल बरींगे यांच्या माध्यमातून गोळा केले रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नंबर आकाश बरींगे व विशाल बरिंगे यांच्या मोबाईल व्हाट्सअप द्वारे देण्यात आले विशाल बरींगे यांचा मोबाईल तसेच व्हाट्सअप नंबर तसेच आकाश बरींगे यांचा व्हाट्सअप नंबर या दोन मोबाईल क्रमांकावर पैसे दिल्यानंतर वाहनांचे नंबर तसेच नंबर प्लेट चे फोटो पाठविण्यात येत होते व दोन व्यक्ती सदर नंबर राजेश गुरव यांच्या मोबाईल नंबर वर पाठवीत होते .राजेश गुरव यांनी चार महिन्याच्या काळात अवैध रेती वाहतुकीचे माध्यमातून लक्षावधी रुपयांची लाच स्वीकारली असून मी स्वतः वैध वाहतूक पासवर वाहतूक करत असताना सुद्धा माझे वाहन अडवून जाणून बुजून पास खोटी आहे चालत नाही असे म्हणत नेहमी लाचेची मागणी करायचे व पैसे न दिल्यास खोटी कारवाई दाखवून वाहन पोलीस स्टेशनला लावून जाणून-बुजून माझ्याविरुद्ध तसेच पैसे न देणाऱ्या विरुद्ध दंडाचा आदेश पारित करत होते मी सदर प्रकाराला कंटाळून पास असल्यावरही विशाल बरींगे व आकाश बरींगे यांच्या माध्यमातून हप्ता देणे सुरू केले तरीही माझ्यावर जाणून-बुजून कारवाई करण्यात आली व त्याबाबत प्रभारी तहसीलदार राजेश गुरव यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता मला पैसे मिळाले आहेत परंतु तुमची तक्रार असल्या मुळे तुमच्यावर कारवाई करावी लागली असे उत्तर दिले सदर प्रकाराची माझ्याकडे व्हिडिओ तसेच ऑडिओ रेकॉर्डिंग आहे तसेच आम्ही रीती वाहतूकदार आकाश बरींगे व विशाल बरींगे यांच्या मध्ये झालेली व्हाट्सअप चॅटिंग सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे तसेच राजेश गुरव त्यांच्या मोबाईलचा कॉल तसेच व्हाट्सअप डाटा चेक केला असता आपणास प्रकरणाची संपूर्ण माहिती उघडकीस येईल व लक्षावधी रुपयांची अवैध उलाढाल लाचेची देवाण-घेवाण झाल्याचे निदर्शनास येईल तरी माझ्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर लाचलुचपत कायद्यान्वये गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय द्यावा अशा प्रकारची तक्रार निखिल ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांच्याकडे 17 मार्चला केली आहे तसेच या तक्रारीच्या प्रतीलीपी पालक मंत्री ना . बच्चुभाऊ कडू विभागीय आयुक्त अमरावती , जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे पाठविले आहेत
अवैध रेती वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई केल्यामुळे तक्रार केली …..
मी आजपर्यंत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 40 ते 45 वाहनांवर कारवाई केली ज्यांच्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली व त्यांचे ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लावण्यात आले त्यांची खोटी पास आहे अशा लोकांनी माझी तक्रार केली यामध्ये अवैद्य रेती वाहतूक करणार्यांचा सुद्धा सहभाग आहे टीम वर्क च्या माध्यमातुन अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच राहील
राजेश गुरव
नायब तहसीलदार तेल्हारा
(यापूर्वीचे प्रभारी तहसीलदार )