पातूर (सुनिल गाडगे) :- अकोला येथील संत गाडगे बाबा कुस्ती केंद्र आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा निवड चाचणी मध्ये पातूर येथील श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचा पठ्ठा पैलवान आदर्श संजय पेंढारकर याने ९२ किलो वजनाने माती विभागात स्पर्धेक चित करून महाराष्ट्र कुस्ती स्परडे साठी स्थान मिळवले आहे. या मुळे राज्याच्या कुस्तीमध्ये पुऱ्या महाराष्ट्रात पातूरचे नाव लौकीक झाले आहे.
पातूर येथील पै.आदर्श संजय पेंढारकर याने अकोला येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्परदेच्या चाचणी मध्ये भाग घेतला होता. या मध्ये याने घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र केसरी स्परदे करिता आपले स्थान निश्चित केले आहे. श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे संथापाक अध्यक्ष पैलवान मंगेश दादा गाडगे यांच्या व्यायाम शाळेत पै. आदर्श संजय पेंढारकर यांनी कुस्तीचे धळे घेतले. पातूर तालुक्यात कमी वयात महाराष्ट्र केसरी माती विभागातून निवड झालेला हा पहिला मल्ल्य आहे. पै. आदर्श संजय पेंढारकर निवडीचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पै. आदर्श ने निवडीचे श्रेय मंगेश गाडगे, चंदू वास्तद, संजय पेंढारकर, विष्णू ढोणे, बालू बगाडे, राजुभाऊ उगले, बालू पोपळघट, डीगांबर उगले, दीपक देवकर, भोरु पैलवान,ईश्वर पेंढारकर, पै. अक्षय तायडे,अजय गाडगे यांनी केले.