पातूर(सुनील गाडगे)- जिल्हयात खुनाचे सत्र सुरूच असून काल पातूर तालुक्यातील कापशी येथे शेतीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे.याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पातूर राष्ट्रीय महामार्गासाठी गेलेल्या शेतीच्या दोन कोटी ४० लाख रुपयांच्या मोबदल्याच्या रकमेबाबत कोर्टात न्यायप्रविष्ट असलेल्या संदर्भात झालेल्या आपसी वादात चुलत भाऊ आणि काकूने पुतण्याचा खून केल्याची घटना कापशी रोड येथे घडल्याचा गुन्हा सकाळी सात वाजून 39 मिनिटांनी गुरुवारी पातूर पोलिसांनी दाखल केला असून खून प्रकरणी दोन जणांना तातडीने अटक करण्यात आले.
फिर्यादी चंदन रामकरण केवट यांनी पातुर पोलिसात दिलेल्या जबानी रिपोर्ट नुसार आरोपी विशाल मुन्नीलाल केवट वय 28 वर्षे रानात कापशी रोड चौफुला बाई मुनी लाल केवट वय पन्नास वर्ष यांच्यामध्ये शेतीबद्दल वाद सुरू होता सदर प्रकरण दिवाणी कोर्टात नाही प्रविष्ट होते या शेतीपैकी काही शेती हायवे नंबर 161 या महामार्ग चौपदरीकरणासाठी शासनाने घेतली आहे.
त्या शेतीचा मोबदला म्हणून दोन करोड 40 लाख रुपये मंजूर झाले होते त्यासंदर्भात फिर्यादी व मृतक यांच्या कोर्ट प्रकरण सुरु याच कारणावरून काल दिनांक 17-3-2021रोजी रात्री दहा वाजता फिर्यादीचा भाऊ मृत पावलेल्या बंटी रामकरण केवट आणि आरोपी विशाल मुन्नीलाल केवट आणि चौफुलाबाई मणिलाल केवट यांनी आधीचा भाऊ मृतक बंटी रामकरण यादव यास शिवीगाळ करून छातीत मारहाण केली.
त्यामुळे गंभीर अवस्थेत नातेवाईकांनी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी बंटी रामकरण केवट यास मृत घोषित केले यासंदर्भातील गुन्हा आज गुरुवारी सकाळी सात वाजून 39 मिनिटांनी पातूर पोलिसांनी दाखल केला अपराध क्रमांक 130/21 कलम 302,504,34 अंतर्गत आरोपी विशाल मुन्नीलाल केवट चौफुलाबाई मुन्नीलाल केवट यांना अटक केली.
पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय आव्हाळे पातुरात दाखल झाले असून पी आय हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर इंगळे अरविंद पवार दिलीप मोडक निलेश राठोड यांच्या पथकाने तातडीने आरोपींना अटक केली.
अकोला मेडशी महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतिपथावर आहे याच महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्याची जमीन महामार्ग बनवण्यासाठी घेतली आहे याचा मोबदला कोट्यावधी रुपयांच्या घरात मिळालेला आहे अचानक मिळालेल्या पैशांमुळे कुटुंबांमध्ये वाद वाढले आहेत यातूनच कापशी रोड येथे खूनाची गंभीर घटना घडली आहे त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.