तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यातील खोदून ठेवलेल्या चारही भागातील रेंगाळत पडलेल्या रस्त्याची कामे पूर्ण करा अन्यथा तेल्हारा हा धुळीचा तालुका म्हणून घोषित करा अशी मागणी तेल्हारा विकास मंचने राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तहसीलदार तेल्हारा यांच्यामार्फत 17 मार्चला निवेदन देऊन करण्यात आली आहे .
शहराला लागुन तेल्हारा तालुक्यातील चारही भागातील रस्ते यापूर्वी खड्डेमय झाले होते त्यानंतर शासनाने रस्ता दुरुस्ती बाबत जे रस्ते खोदून ठेवले आहे परंतु रस्त्याच्या कामाची प्रगती पाहता हे रस्ते केव्हा होणार ते समजण्या पलीकडे गेले आहे तालुक्यातील तेल्हारा ते हिवरखेड , तेल्हारा ते माळेगाव, तेल्हारा ते आरसुळ, तेल्हारा ते पाथर्डी या चारही भागातील रस्ते खोदून ठेवले व रस्त्यांमध्ये मुरूम मीस्त्रीत माती टाकण्यात आल्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून श्वासाचे ,फुफ्यूसाचे त्रास व डोळ्याचे आजार होऊ लागले आहे आधी प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून या रस्त्यांवर अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे या चारही रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याची भरपाई शासनाने करून द्यावी व या चारही रस्त्यांचे विनाविलंब कामाला सुरुवात करण्यात यावी व काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा तेल्हारा हा धुळीचा तालुका म्हणून घोषित करा अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तेल्हारा विकास मंच ने तहसीलदार यांच्या मार्फ़त निवेदन देऊन केली आहे यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर ,मोहन श्रीवास, स्वप्नील सुरे , नितीन मानकर, लखन सोनटक्के, निलेश मानकर,नीलेश खाड़े, गणेश भटकर , गौतम दामोदर, सचिन सोनटक्के , अमोल तायडे, शिवा राऊत, मंगेश हागे ,राजेश देशमुख , सोनू सोनटक्के इत्यादी विकास मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते