नवी दिल्ली : भारतीय महिला कुस्तीमध्ये फोगाट सिस्टर्सचे मोठे नाव आहे. गीता फोगाट आणि बबीता फोगाट यांनी आपल्या खेळाने भारताचा गौरव वाढवला आहे. फोगाट सिस्टर्स संबंधी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गीता आणि बबीता फोगाट यांच्या मामे बहिणीने आत्महत्या केली आहे. रितीका फोगाट आपल्या कुस्तीने देशाचं नाव उंचावण्याची इच्छा ठेवत होती. यासाठी ती प्रचंड मेहनतही घेत होती. पण, एक पराभव तिला पचवता आला नाही. तिने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. रितीका फोगाट हिचा कुस्तीचा प्रवास छोटा राहिला आहे. स्टेट लेवल सब ज्युनियर टूर्नामेंटमधील पराभवानंतर तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार, टूर्नामेंट 12 ते 14 मार्चदरम्यान भरतपुरमध्ये खेळवण्यात आली. रितीका फोगाटच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
फायनल मॅच 14 मार्च रोजी खेळवण्यात आली, ज्यात रितीकाला एका पॉईंटने पराभव स्विकारावा लागला. हा पराभव तिला पचवनं शक्य झालं नाही, ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. सांगितलं जातंय की, द्रोणाचार्य अवॉर्ड जिंकणारी महावीर फोगाटही या टूर्नामेंटमध्ये उपस्थित होती. रितीकाने पंख्याला दुपट्टा बांधून फाशी घेतली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रितीकाच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम केल्यानंतर तो कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.