अकोला(प्रतिनिधी)- बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात एका 25 वर्षिय अनोळखी युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आज रोजी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, सदर युवतीची जाळुन हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे….बोरगाव मंजू पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात वाधोळकर यांचे शेत आहे,ते आज सकाळी आपल्या शेतात कुटार आणण्यासाठी गेले असता त्यांना सदर युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, दरम्यान सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली.
तर घटना स्थळावर मुर्तीजापुर पोलिस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार , गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक, ठसे तज्ज्ञ,सह बोरगाव मंजू पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर अर्धवट जळालेला मृतदेहासह घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला,
नेमका घातपात की काय, घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असुन तो हत्यारा कोण या दृष्टिकोनातून पोलिस अधिक तपास करत आहेत.