अकोट (शिवा मगर)– गत वर्षीचा लॉकडाऊन संपूर्ण शासनाने दिलेल्या अटी शर्ती नुसार संगीत कलावंत. साऊंड व मंडप व्यावसायिकाचा व्यावसाय पूर्व पदावर येत नाही. तोच परत लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे उपास मारीची वेळ सर्व कलावंतांवर तसेच साऊंड मंडप व्यावसायिकांवर येऊन ठेपली, जगणे तरी कसं? हा प्रश्न वरील सर्व कलाकारांना पडला, यातून बर्याच कलावंतांना नैराश्य येत आहे. त्यातूनच आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा होत आहे. मागील आठवड्यात नागपूर मधील एका कलाकाराने ह्याच चिंतेतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, शासनाने केवळ 20 ते 25 लोकांचीच लग्ना करिता अनुमती दिल्या कारणाने, त्यावर अवलंबून असणारे व निगडित असणारे सर्व व्यावसाय बंद पडले, वरील सर्व व्यावसायिकांचे जगणे सुरळीत होण्यासाठी व पुढील अनर्थ टळण्यासाठी शासनाने लग्न समारंभासाठी मर्यादित लोकांची घातलेली अट कमी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी अकोट कलावंत ,अनुकूल सांगोळे ,श्रीकांत ढवळे प्रशांत पिंपळे ,वासुदेव दामधर,आदर्श अग्रवाल ,अमोल मानकर ,अक्षय नाचणे ,सुनील उकर्डे,संतोष निमकर ,अजय शर्मा,मुकेश जावरकर,रजनीताई भवाने ,स्वाती देशमुख ,रोहित दापुरे,वैष्णव बोरोडे ,दुर्गेश बाळे,महेंद्र सोनवणे ,रोशन नाठे,यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली