तेल्हारा(प्रतिनिधी)- आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बाधित ठेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नव्याने रुजू झालेले ठाणेदार नितीन देशमुख यांनी आज शांतता समितीच्या सभेत केले.
आज तेल्हारा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा बोलावण्यात आली होती यावेळी ठाणेदार देशमुख म्हटले संवेदनशील असणाऱ्या अकोला जिल्ह्यात माझी बदली झाली आणि त्यात नेहमीच शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या तेल्हारा येथे बदली झाल्याने मला आनंद आहे असे सांगितले यावेळी शांतता समितीचे सदस्य पत्रकार प्रतिष्ठित नागरिक यांची ओळख करून येणाऱ्या आगामी सण उत्सव काळात नागरिकांनी सहकार्य करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले तसेच जे नागरिक प्रशासनाला सहकार्य करणार नाहीत अशांवर कारवाई होणार.तसेच यावेळी शहरातील वाहतुकीची समस्या दूर करू असे सांगितले.यावेळी विविध विषयांवर चर्चा करून विषय मार्गी लावन्याचे आश्वासन दिले.सभेला शांतता समितीचे सदस्य ,प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते.