अकोला(दीपक गवई)– कोरोनाचा वाढता प्रभाव बघता जिल्हा प्रशासनाकडून शनिवार रविवार सम्पूर्ण लॉक डाऊन चा आदेश देण्यात आला होता.तो आता रद्द करण्यात आला आहे.
अकोला शहर व जिल्ह्यातील शनिवार व रविवारची संचारबंदी पुर्णपणे स्थगित करण्यात आली आहे, अशी घोषणा पालकमंत्री ना. बच्चूभाऊ कड़ी यांनी आज अकोला येथे केली. मात्र दररोज ५ वाजता नंतर होणारे लॉकडाऊन क़ायम राहणार आहे. राज्यशासनाचे दिशानिर्देश व अकोला जिल्हाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे ना कडू यांनी सांगीतले.
यामु़ळे उद्या शनिवार १३ व रविवार १४ मार्चला संपूर्ण बाजारपेठ सकाळी ९ ते दुपारी ५ वाजता पर्यंत सुरू राहणार आहे.करोनाचा संसर्ग वाढत असला तरी हा निर्णय घेण्यामागे कारण आहे. सद्या सामुहिक रोगप्रतिकार शक्ती वाढत असुन ती अधिक गतीने वाढविल्यास करोनापासून धोका कमी होईल. यामु़ळे टोटल लॉकडाऊन स्थगित करण्यात येऊन अकोल्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण बंदचा आदेश जिल्हा प्रशासनाने मागे घेतला.त्यामुळे आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.मात्र, सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची संचारबंदी कायम असणार