अकोला(प्रतिनिधी)- राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द करण्याच सत्र या राज्य सरकारने सुरू केले होते याचा काल उद्रेक होत राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी राज्यभर रस्त्यांवर उतरले आणि राज्यसरकारचा विरोध करत होते भाजयुमो ने या आंदोलनात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर,भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर ठिकठिकाणी सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष केला.
भाजयुमो ने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन आज दुपारी ०३ च्या आधी परीक्षांबाबत निर्णय जाहीर करावा अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा ईशारा राज्यसरकार ला देण्यात आला होता.भाजयुमो अकोला जिल्हा तर्फे केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने JEE NEET परीक्षा कश्या नियोजनबद्ध कामात पार पडला याबाबत मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवले होते आणि केंद्रीय शिक्षण मंत्री ना.रमेश पोखरियाल निशंक व केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री ना.संजयभाऊ धोत्रे यांनी नियोजनात्मक पद्धतीने जश्या इतर परीक्षा पार पडला त्याच धरती वर राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देखील पार पाडाव्यात अशी मागणी यावेळी केली होती.
राज्यसरकाने विद्यार्थ्यांचा उद्रेक व भाजयुमो ने दिलेल्या इशाऱ्यामुळे आज सकाळीच १४ मार्च ला होणारी परीक्षा जी रद्द केली होती ती आता येत्या २१ मार्च होईल असे जाहीर केले आहे पण पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ नये याची काळजी राज्य सरकारने घ्यावी जेणे करून विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये आणि योग्य ते नियोजन करून परीक्षा चे आयोजन करण्यात यावे अशी ही मागणी यावेळी केली आहे.
विद्यार्थी तसेच युवकांच्या प्रश्नासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी भाजयुमो चेपदाधिकारी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे तेजराव थोरात यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर,जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे,किरण पाटील अवताडे,प्रवीण डिक्कर,महानगर सरचिटणीस अभिजित बांगर,निलेश काकड,उज्वल बामनेट,जिल्हा युवती आघाडी अध्यक्ष ऍड.रुपाली राऊत,अक्षय जोशी,केशव हेडा,भूषण इंदोरीय,अभिषेक भगत,रितेश जामनेरे, टोनी जयराज,वैभव मेहरे आदी पदाधिकारी व सदैव तत्पर राहतील असा विश्वास भाजयुमो प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केले आहे.