जगभरातील Whatsapp यूझर्ससाठी मोठी खुशखबर आहे. आगामी काळात व्हॉट्सअॅपवर एक खास टॅब दिसेल, ज्यावर ते इन्स्टाग्राम रील्सचे छोटे व्हिडिओदेखील पाहतील. एका अहवालात समोर आलेल्या अहवालानुसार फेसबुकने व्हॉट्सअॅपवर डेडिकेटेड इन्स्टाग्राम रील टॅबची चाचणी सुरू केली आहे आणि येणाऱ्या काळात जे काही डेव्हलपमेंट होईल त्यामध्ये व्हॉट्सअॅपमध्येही हे खास फीचर मिळणार आहे.
व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ही फेसबुकच्या मालकीची कंपन्या आहेत आणि अलिकडच्या वर्षात सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेशन प्रक्रियेवर जोर देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपवर बरीच फिचर्स जोडली गेली आहेत आणि आता फेसबुक व्हॉट्सअॅपवर एक खास टॅब लावण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यावर वापरकर्ते इन्स्टाग्राम रील्स पाहू शकतात. कदाचित रील्स बनविण्यासदेखील सोय केली जाऊ शकते. त्याचा तपशील येत्या काळात येईल.
WABetaInfoने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुक इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची वैशिष्ट्ये इंटिग्रेशन करण्याच्या प्रयत्नात व्यग्र आहे. व्हॉट्सअॅपमध्ये इन्स्टाग्रामच्या खास वैशिष्ट्यांचा आनंद घेता येईल असा विचार करत आहे. तथापि, ही प्रक्रिया अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहेत आणि याबद्दल काही ठोस माहिती उपलब्ध होताच आम्ही आपल्याला निश्चितपणे कळवू. येत्या काळात व्हॉट्सअॅपवर बरीच खास फिचर्स जोडली जात आहेत, ज्यात मल्टी-डिव्हाइस सपोर्ट, संगणक आणि लॅपटॉपवरील व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधेचा समावेश आहे.