मुंबई : MPSC परीक्षेची अखेर तारीख ठरली आहे. परीक्षा २१ मार्चला होणार आहे. एमपीएससी पूर्वपरीक्षा स्थगित केल्यानंतर राज्यभर संतापाचा गुरुवारी उद्रेक झाला.गाव-खेड्यांतून शहरांमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीस्थगित एमपीएससी परीक्षा लवकरच होईल, अशी घोषणा आज केली.
तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत येत्या 14 मार्च, 2021 रोजी नियोजित केलेल्या राज्य सेवा पूर्वपरीक्षा सरकारच्या विनंतीनंतर कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी अचानक जाहीर केला. आतापर्यंत तब्बल पाच वेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी तब्बल 2 लाख 62 हजार विद्यार्थ्यानी नोंदणी केली आहे. परीक्षा तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा एसएमएस येऊन पडताच हे सारे परीक्षार्थी रस्त्यावर उतरले.