अकोला(डॉ चांद शेख)- अकोला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे दिनांक 8 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त महिलांचा मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालयाचे न्यायधिश मा. एस.ए. ठाकरे ह्या प्रमुख पाहुणे म्हणुन हजर झाल्या तसेच त्यांच्या सोबतीला इतर प्रमुख वक्ते म्हणुन मा. एस. एम. बैस, सह दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अकोला तसेच मा.पी. दि मोरे, मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला तसेच पी. पी.नातू मँडम 4थे दिवाणी न्यायाधीश क.स्तर आणि जे. वाय. मसके मँडम 6वे दिवाणी न्यायाधीश क.स्तर,अकोला यानी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रम यशस्वी होण्यास मोलाचा हातभार लावला. या कार्यक्रम मध्ये अनेक कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन देण्यात आले. याशिवाय अकोला बार असोशिएशन च्या महिला विधिज्ञ यांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून कार्यक्रमाचा पूर्ण फायदा घेतला. या कार्यक्रमास विधिज्ञ श्रीमती संगीता भाकरे यांनी नीट रूपरेषा आखून मेहनत घेतली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला चे अध्यक्ष मा. श्री य. गो. खोब्रागडे यांच्या अनुमती ने श्री एस.एस.बोस, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांनी सभागृहाची उपलब्धता करून देवून कार्यक्रम पार पाडणे साठी इतर सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडला.. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुनील पाटील, श्रीहरी टाकळीकर, राजेश देशमुख, कुणाल पांडे, शाहबाज खान यांचे विशेष सहकार्य लाभले.