अकोला(प्रतिनिधी)- केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्या सतत पाठपुराव्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे साकारण्यात येणारं सेंटर ऑफ एक्सैलेन्स फोर इंटरनेट ऑफ थिंग्स इन एग्रीकल्चर ‘कृषी माहिती तंत्रज्ञान गुणवत्ता केंद्र’यासाठी केंद्र सरकारने अकरा कोटी रुपये कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रयत्नशील असणारे नेतृत्व असून विदर्भ व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्थान व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नामदार रविशंकर प्रसाद व रमेश पोखरियाल यांच्या मार्गदर्शनात सातत्याने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रोद्योगिकी मंत्रालयाच्या माध्यमातून व शैक्षणिक मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजना राबवून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करीत आहेत.या गुणवत्ता केंद्रांच्या माध्यमातून सध्याच्या शेतीच्या विविध उदयोन्मुख गरजा पूर्ण करण्यासाठी 25 स्टार्ट-अप सुरु करून दूरस्थ संवेदन, अचूक शेती यांत्रिकीकरण, मृदा आरोग्य व्यवस्थापन, हायड्रोफोनिक्स व पॉलीहाऊस तसेच स्मार्ट कृषी अनुप्रयोग इत्यादीस चालना मिळेल.
शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे व ग्रामस्थ स्वराज्याची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी व पंडित दीनदयाल उपाध्याय यांची संकल्पना साकार व्हावी यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नवीन विक्री पद्धती, शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी, हवामान बदल संबंधित उपाय योजना साठी या केंद्राचा उपयोग होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजयजी धोत्रे यांनी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रद्योगिक मंत्रालयाच्या माध्यमातून अकोलेकर यांच्या सेवेसाठी विशेषतः पश्चिम विदर्भ व विदर्भाच्या शेतकर्यांचना कल्याणकारी ठरणाऱ्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी स्वदेशी तंत्राचा वापर करून विकास सेवेचा नमुना चाचणी पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी,25 नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडावी,स्मार्ट कृषी यांत्रिकीकरण अचूक शेती भाजीपाला व माती पोषण हवामानाचा परिणाम तसेच भारत व अन्य वाढीच्या बाजारपेठ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळकटीसाठी याचा उपयोग होणार आहे या माध्यमातून उत्पादन प्रोटोटाइपिंग टिकाऊ व्यवसायीकरण तसेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या निराकरणासाठी याचा उपयोग होणार आहे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी परंपरागत शेती सोबत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा व जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये टिकावा यासाठी अभ्यासपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी व पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कल्याण व्हावा यासाठी कृषी माहिती तंत्रज्ञान गुणवत्ता केंद्र स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.