अकोला(अमोल सोनोने)– सामाजिक सेवा कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगचे अभियान “सद्भावना भेंट” या सूत्रांनुसार जागतिक महिला दिन निमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संतोष बजाज यांच्या मार्गदर्शनात अकोला येथील स्थानिक गायत्री बालिका आश्रम आणि उत्कृष्ट बाल शिशु आश्रममध्ये जीवनापयोगी वस्तु “सद्भावना भेंट” देऊन हर्षोल्लासात जागतिक महिला दिन साजरा करुन मातृशक्तिला नमन करण्यात आले .
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगचे अभियान “सद्भावना भेंट” या सूत्रांनुसार या कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ युवा सेल अध्यक्ष श्रीकांत तलोकार , विदर्भ युवा उपाध्यक्ष दिव्या चव्हाण, सुरभी दोड़के, राहुल दुलानी, रवि चावला, नितिन राजपाल, दिनेश कुकरेजा आदींनी केले होते . आश्रमातील गणेश कालकर आणि समिति यांनी मान्यवरांचे स्वागत केले . यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतोष बजाज, राष्ट्रीय विधि सलागार ऍड विशाल पंजवानी, ऍड सतीश कोटवानी आदींची उपस्थिती होती .