अकोट(शिवा मगर)– सर्वत्र आठ मार्च जागतिक महिला दिन साजरा होत असताना आकोट पंचायत समिती अंतर्गत येत असणाऱ्या शिक्षण विभागातील गटसाधन केंद्र येथे कार्यरत एका शासकीय कर्मचाऱ्याने महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून महिला सक्षमीकरणाच्या घोषणा पोकळ ठरत असून आजही महिलांवर होत असणारे अत्याचार या प्रकाराने पुढे आले आहेत पोलीस सूत्रांनुसार अकोट पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत असणारा आरोपी कर्मचारी दिनेश धंदर याने विभागातील महिला कर्मचारीस एक वर्षापासून जवळीक साधने,मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवणे अश्लील नजरेने धक्के लावणे अशा प्रकारे विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनला 8 मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 354(अ) 354 (ऊ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ मार्च रोजी गुन्हा दाखल झाल्याने शहरात खळब उडाली आहे.याप्रकरणी पुढील तपास अकोट शहर पोलीस करत असून शासकीय विभागांमध्ये कार्यालयीन ठिकाणी झालेल्या या प्रकाराने महिला कामाच्या ठिकाणी सुरक्षित आहेत का असाप् प्रश्नसमोर आला असून जनसामान्यां मधून याघटने विषयी चीडव्यक्त होत आहे.