अकोला, : दि. 5 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1954 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1548 अहवाल निगेटीव्ह तर 406 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 250 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 58 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 18389(15216+2996+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 112836 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 110493 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1966 नमुने होते. आजपर्यंत एकूण 112530 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 97314 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
406 पॉझिटिव्ह
आज सकाळी 272 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 95 महिला व 177 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील हिवरखेड येथील 18, जीएमसी, शिवर व कुरणखेड येथील प्रत्येकी 11, सिंधी कॅम्प, गोरक्षण रोड, तेल्हारा येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, कापशी, अडगाव, जठारपेठ, वारुडा येथील प्रत्येकी आठ, मोठी उमरी, उमरी अरव, कृषी नगर व बोरगाव मंजू येथील सात, अकोट, रतनलाल प्लॉट, उपडी बाजार, मलकापूर, डाबकी रोड, संतोष नगर, हातरुण, वाडेगाव, डोंगरगाव येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व पारस प्रत्येकी चार, दुर्गा चौक, शास्त्री नगर, धाबेकर नगर, गायत्री नगर व उरळ येथील प्रत्येकी तीन, खडकी, हिंगणा फाटा, अडगाव, मंगरुळ कांबे, रवी नगर, जवाहर नगर, पिकेव्ही कॉलनी, कोठारी वाटीका, तोष्णीवाल लेआऊट, रचना कॉलनी, तापडीया नगर, चौरे प्लॉट, आपातापा प्रत्येकी दोन, तर उर्वरित मालती रेसिडेंसी, शिवाजी चौक, माधव नगर, वनीरंभापूर, पोळा चौक, वर्धमान नगर, माणिक टॉकीज, दहिहांडा, भरतपूर, दहिगाव, गोरेगाव, तिडके नगर, सरकारी बगीच्या, दिवेकर आखाडा, दगडपाडवा, वाशिम बायपास, चौहगाव, रामदासपेठ, तेल्हारा, आळसी प्लॉट, विद्युत कॉलनी, छोटी उमरी, एलआरटी कॉलेज, दगड्डी पुल, सिटी कोतवाली, जूने आरटीओ ऑफिस, पिंपळखुटा, व्याळा, केएस पाटील हॉस्पीटल, कमल गार्डन, जेल व निंबी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 134 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 30 महिला व 104 पुरुषांचा समावेश आहे. त्यात कच्चीपक्की खोली येथील 29, अकोट येथील 28, आळंदा येथील सात, कोठडी येथील पाच, कान्हेरी सरप व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी चार, धोंडा आखर, कैलास टेकडी, डाबकी रोड, उमरी, गिता नगर, अकोली जहागीर येथील प्रत्येकी तीन, कौलखेड, गंगा नगर, दोनद, दानापूर, अकोट फैल, बोर्डी, खंडाळा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित टॉवर चौक, तुकाराम चौक, बार्शीटाकळी, भागवत वाडी, काजळेश्वर, नवरंग सोसायटी, गायत्री नगर, खडकी, फडके नगर, वाशिम बायपास, आपातापा रोड, केशव नगर, जूने शहर, महसूल कॉलनी, जेतवन नगर, तारफैल, कंवर नगर, कोलविहीर, पणज, रौदंळा, अकोलखेड, दुर्गा चौक, निमवाडी, हरिहर पेठ व वारुळा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 58 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 272, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 134 तर रॅपिड चाचण्यात 58 असे एकूण 464 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
250 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील 22, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील तीन, सहारा हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पीटल येथील सहा, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील नऊ, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून 12, आर्युवेदिक रुग्णालय येथून तीन, अवघाते हॉस्पीटल येथून एक, आधार हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून दोन, तर होम आयसोलेशन येथील 153 जणांना असे एकूण 250 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
तिघांचा मृत्यू
दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील रहिवासी असलेला ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी मोठी उमरी, अकोला येथील रहिवासी असलेला ८१ वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. २ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य ६७ वर्षीय पुरुष रुग्ण वानखडे नगर, अकोला येथील रहिवासी असून या रुग्णास दि. २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
4340 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 18389(15216+2996+177) आहे. त्यातील 381 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 13668 आहे. तर सद्यस्थितीत 4340 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.