अकोट तालुक्यातील वरुर जऊळका येथे योग योगेश्वर संस्थांमध्ये प्रगटदिन महोत्सवात गजानन विजय ग्रंथाचे पारायण व रात्री हरी कीर्तनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते .प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी श्री अमोल डोयफोडे यांनी श्रींच्या मूर्तीचा अभिषेक केला तद्नंतर गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले व ह भ प गणेश महाराज शेटे यांचे काल्याचे किर्तन पार पडले त्यामध्ये समर्थ सद्गुरु गजानन महाराज चरित्र सांगत असताना महाराजांनी सांगितले देविदास बुवा पातुरकर यांच्या घरी ऋतू शांती चा कार्यक्रम होता उष्ट्या पत्रावड्या घराच्या समोर वटवृक्षाच्या जवळ टाकल्या माघ शुद्ध सप्तमी च्या दिवसाला दुपारी बारा वाजता समर्थ सद्गुरु गजानन महाराज शेगाव नगरमध्ये प्रगट झाले ऊसट्या पत्रवळी वरील भाताचे शीत वेचून खायला लागले हे द्रृष्य बंकटलालाने पाहिले व महाराजांच्या जवळ जातो आणि महाराजांना विनंती केली की महाराज ऊसष्या पत्रावळी वरील भाताचे शेत वेचून खाऊ नका इच्छा असेल तर पंचपक्वान्नाचे पात्र वाढून आणतो महाराज म्हणतात जा तुझी इच्छा आहे तर घेऊन ये महाराजांच्या समोर पंचपक्वान्नाचे पात्र वाढून आणले पण महाराज मिटक्या मारत जेवण करत नाहीत सर्व अन्न कालावले एकत्र केलं आणि भोजन केले समर्थ गजानन महाराजांनी या कृतीतून संदेश हाच दिला तुमच्या ताटामध्ये कितीकही पक्वान्न असले तरी पण जाईल तर एकाच पोटात म्हणून अन्नाची नासाडी करू नका अन्न हे पूर्णब्रह्म आहे उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म सध्या श्रीमंताच्या लग्नामध्ये बफे पार्टीत एवढं अन्न वाया जातं की वाया गेलेल्या अन्नामध्ये एखाद्या गरिबाच्या मुलीचे लग्न होईल आणि म्हणून महाराजांनी भक्तांना अन्नाची महती पाटवण्या करिता व जड जीवाचा उद्धार करण्या करिता अवतार घेतला एवढंच नाही तर ज्या गजानन महाराजांना भाताचे शीत खावे लागले त्या महाराजांच्या नावाने आज कितीतरी ठिकाणी अन्नदान होत आहे ही महती समर्थ सद्गुरु गजानन महाराजांची आहे असे प्रतिपादन गणेश महाराज शेटे यांनी काल्याच्या किर्तना मध्ये केले त्यानंतर भाविकांना बेसन पोळीचा महाप्रसाद देण्यात आला प्रसाद घेतेवेळी भाविकांनी शिस्तीचे पालन करून प्रसाद सेवन केला व गावकऱ्यांनी योग योगेश्वर संस्थांमध्ये दररोज समर्थ सद्गुरु गजानन महाराजांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करण्याचा संकल्प केला कार्यक्रमामध्ये काटी पाटी व वरुर जऊळका येथील भाविकांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला या सर्व कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी तन-मन-धनाने सहकार्य केले असी माहिती श्री रतन पाटील वानखडे यांनी दिली