तेल्हारा(प्रतिनिधी) – श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त तहसील कार्यालय, तेल्हारा येथे .चि.रणवीर अजय गावंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तहसीलदार राजेशजी गुरव साहेब यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तहसीलदार राजेश गुरव, राजकुमार शेंडे,अनुप मार्के,विवेक खारोडे,ज्ञानेश्वर मार्के,अजय पा.गावंडे,ऍड.संदीप देशमुख, गजानन भोपळे,अनंत सोनमाळे,गणेशराव शेंडे,गजानन गायगोळ,सुभाष फाटे,उद्धव पाथ्रीकर,ऍड.आशुतोष राहाणे, ज्ञानेश्वर वाकळे,विजय देशमुख उपस्थित होते.