अकोला – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1819 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1395 अहवाल निगेटीव्ह तर 424 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 17925(14810+2938+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 110726 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 108397 फेरतपासणीचे 377 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1952 नमुने होते. आजपर्यंत एकूण 110576 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 95766 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
424 पॉझिटिव्ह
आज सकाळी 282 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 119 महिला व 163 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 40,पारस येथील १४, डाबकी रोड येथील १६, कौलखेड, बार्शीटाकळी व खडकी येथील प्रत्येकी ११, मोठी उमरी येथील १०, पातूर येथील नऊ, जीएमसी व ऊरळ खु. येथील प्रत्येकी आठ, जठारपेठ व खोलेश्वर येथील प्रत्येकी सहा, राम नगर, रामदासपेठ, व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, खेडकर नगर, रजपूतपुर, आदर्श कॉलनी, रतनलाल प्लॉट, म्हैसांग, तापडीया नगर, मलकापूर, अकोट, सिंधी कॅम्प, बाळापूर व जूने आरटीओ येथील प्रत्येकी तीन, गर्ल्स हॉस्टेल, कळबेंश्वर, मनकर्णा, गजाननपेठ, अखातवाडा, किन्हकिनी, कोठारी नगर, न्यु खेतान नगर, तेल्हारा, पोपटखेड, पातूर, म्हातोंडा, वडगाव मेंडे, नयगाव, समता नगर, येदलापूर व जामठी बु. येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित यलवन, अकोट फैल,गजानन पेठ, शिवर, विठ्ठल नगर, दगडपूल, जीएमसी हॉस्टेल, सागर कॉलनी, समता नगर, कॉग्रेस नगर, तारफैल, माधव नगर, आदर्श कॉलनी, न्यु तापडीया नगर, खदान, जूने शहर, श्रध्दा नगर, दुर्गा चौक, देहगाव, आपातापा, कापसी, दहिखेड ता.अकोट, गायत्री नगर, नखेगाव ता.अकोट, भागवतवाडी, गोकूल कॉलनी, सहकार नगर, इसीएचएस हॉस्पीटल, रणपिसे नगर, गड्डम प्लॉट, रणपिसे नगर, दहिहांडा, अंदुरा, मांजरी, वाशिम बायपास, महाजनी प्लॉट, शिवनी, गोडबोले प्लॉट, हनुमान वस्ती, तुकाराम चौक, केशवनगर, रागीनी वर्कशॉप, टॉवर चौक, शिवाजी नगर, अयोध्या नगर,वानखडे नगर, सिसा बोदरखेड, लहान उमरी, हमता प्लॉट, राजूरा घाटे, विद्या नगर, निता गेस्ट हाऊस व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, तसेच आज सायंकाळी १४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५० महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथे २१, अकोट येथील १६, बार्शीटाकळी येथील १५, डाबकी रोड येथील १०, उकडी बाजार येथील आठ, गोरक्षण रोड व पातूर येथील प्रत्येकी सात, कुरुम येथील पाच, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी चार, रामनगर, बुरड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, सस्ती, तुकाराम चौक, खोलेश्वर, न्यु तापडीया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित न्यु महसूल कॉलनी, कारला, व्हीएचबी कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, न्यु राधाकिशन प्लॉट, धोतर्डी, अकोट फैल, खदान, जाफराबाद, गोरवा, गणेश नगर, जूने शहर, शास्त्री नगर, गिता नगर, अनभोरा, गंगा नगर, छोटा पुल, पंचशिल नगर, माधव नगर, माळेगाव बाजार, बालाजी नगर, सांगवी बाजार, राम नगर, सोनाळा व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 55 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 282, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 142 तर रॅपिड चाचण्यात 55 असे एकूण 479 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
256 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 27, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील 22, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील 10, सहारा हॉस्पीटल येथून पाच, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून 11, आर्युवेदिक रुग्णालय येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून पाच तर होम आयसोलेशन येथील 144 जणांना असे एकूण 256 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
चौघांचा मृत्यू
दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ७६ वर्षीय पुरुष रुग्ण अंबिका नगर, खदान, अकोला येथील रहिवासी असून या रुग्णास दि. १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तापडीया नगर अकोला येथील रहिवासी असलेली ७२ वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. १ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर सायंकाळी चान्नी ता. पातूर येथील रहिवासी असलेले 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. 24 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य 68 वर्षीय पुरुष रुग्ण गोरक्षण रोड, अकोला येथील रहिवासी असून या रुग्णास दि. 25 फेब्रुवारी रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
4129 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 17925(14810+2938+177) आहे. त्यातील 378 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 13418 आहे. तर सद्यस्थितीत 4129 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.