अकोला(प्रतिनिधी) – पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर अर्थात बाटली बंद पिण्याचे शुद्ध पाणी उत्पादनासाठी लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल आणि डिझेल च्या किमती वाढल्याचा फटका पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व्यवसायाला बसला असून महागाईमुळे या उद्योगावर अवकळा आली असून नाईलाजास्तव बाटली बंद पाण्याच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर चा व्यवसाय करताना व्यावसायिकांना अनंत अडचणी येत आहेत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ची बैठक वाशिम बायपास अकोला येथे घेण्यात आली. यावेळी अकोला व वाशिम जिल्ह्यातील अनेक उत्पादक उपस्थित होते.
यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अकोला येथील व्यावसायिक सचिन अग्रवाल यांनी पॅकेज्ड ड्रिंकिंग व्यवसाय करण्यासाठी येत असणाऱ्या अडचणीवर प्रकाश टाकला. काही परदेशी वस्तूवर आयात बंदी असल्यामुळे भारतात प्लास्टिक उद्योग हा अपुरा पडत आहे. प्लास्टिक पासून बनणारा प्रिफॉम हा त्यामुळे सतत महाग होत चालला आहे . लेबलच्या किमतीही वाढतच आहेत. अशातच पेट्रोल व डिझेल ची दरवाढ आकाशाला भिडल्याने या व्यवसायात टिकणे खूप कठीण होऊन बसले आहे. मात्र बाजारातील स्पर्धा प्रचंड जीवघेनी असल्याने तसेच डीलर्स ही वस्तूस्थिती समजून न घेता कमी दराने मागणी करतात जे कि उत्पादकाला देणे शक्य नाही. त्यामुळे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असोसिएशनने सर्व डीलर्सला आवाहन केले आहे कि घाऊक वितरकांनी, डिस्ट्रीब्युटर्सनी वाढत्या महागाईचा विचार करता मॅनुफॅक्चरर्स ला नवीन ठरलेले दर देऊन सहकार्य करावे. वाहतुकीचा खर्च लक्षात घेता उत्पादक केवळ 5 रुपये प्रति बॉक्स अर्थात प्रति बॉटल फक्त 35 ते 40 पैसे एवढ्या अत्यल्प मार्जिन वर व्यवसाय करणार आहेत. शेवटी इच्छा नसतानाही नाईलाजास्तव दरवाढ करण्याचा निर्णय प्लांटधारकांना घ्यावा लागला.
सदर बैठकीला अकोला येथील श्री. सचिन अग्रवाल अर्जुन ॲक्वा, श्री महेश शुक्ला केन्स प्युरीट ॲक्वा, श्री भुषण इंगळे जलराज ॲक्वा, श्री. विशाल केसवानी ओरेन ॲक्वा, श्री. पंकज साकला मधुर जल, डॉ के एस पाटील हेल्थ सर्व्हिस एच टू ओ ॲक्वा, श्री. महेश बगडीया सेलिनी ॲक्वा रिसोड, श्री. संदीप गायकवाड ॲक्वा ग्रो मालेगाव, एस आर ढोमणे अँड सन्स सहारा ॲक्वा बार्शिटाकळी, श्री. गजानन भोयर जलदीप ॲक्वा वाशिम, श्री. अशोक चांडक थंडर ॲक्वा अकोट. इत्यादी प्लान्टधारक व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.
असे असतील नवीन दर
नवीन दरानुसार 1 लिटर च्या 12 बॉटलसाठी 85 रुपये प्रति बॉक्स या दराप्रमाणे आणि 500 मिली च्या 24 बॉटलचा बॉक्स 115 रुपये बॉक्स प्रमाणे प्रत्येक प्लांट व कारखान्यातून घाऊक वितरक, डिस्ट्रीब्युटर्स यांना (एक्स. फॅक्टरी नुसार) विक्री केल्या जाईल. यामध्ये वितरकांना वाहतूक खर्च वेगळा द्यावा लागणार आहे. तर वितरकांकडून किरकोळ विक्रेते आणि दुकानदारांना याआधी 90 रुपयांना मिळणारा 1 लिटरचा बॉक्स आता 100 रुपयांना मिळणार आहे. आणि पूर्वी 130 रुपयांना मिळणारा अर्धा लिटरचा बॉक्स 150 ते 160 रुपयांना मिळणार आहे. असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.