अकोला : काँग्रेसमध्ये महानगराध्यक्षांसह प्रदेश महासचिवपदापर्यंत काम करणारे भरगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भारिप बहुजन महासंघात प्रवेश घेतला होता. भारिप-बमसंच्या तिकिटावर त्यांनी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूकही लढविली होती. मात्र, ते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात फारकाळ रमले नाही.
विधानसभा निवडणूक आटोपताच आणि अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक वेगळी चूल मांडण्यासाठी आघाडीचा प्रयोग सुरू केला होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी मुंबईत त्यांची घरवापसी करून घेतली. भखरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, आमदार वजाहत मिर्झा, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, संजय लाखे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सेलचे प्रदीप वर्तक आदी उपस्थित होते.