तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून लॉक डाऊन संदर्भात आदेश जारी करण्यात आले होते.कंटेन्मेंट झोन वगळता इतर तालुक्यात मुभा देण्यात आली होती.मात्र वेळोवेळी प्रशासनाकडून निर्णय बदलीत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून २८ फेब्रुवारी पर्यंत कंटेन्मेंट झोन वगळता इतर तालुक्यात रविवारी संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते मात्र आज तेल्हारा तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण प्रशासनाचा समनव्ययाचा अभाव यासाठी कारणीभूत ठरला आहे.आज रविवार रोजी शहरातील तसेच तालुक्यातील प्रतिष्ठाने व्यवसायिकांनी बंद ठेवले कारण प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचे आदेश व्यवसायिक तसेच जनतेपर्यंत पोहचवण्यात आले नसल्याने व्यवसायिकांनी भीती पोटी आपली दुकाने उघडलीच नाही मात्र तहसीलदार यांनी दुकाने सुरूच ठेवण्याचे न प प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना आदेश दिल्याचे माहिती आहे मात्र नागरिक रविवारचा लॉक डाऊन आहे असे समजून बाहेर पडलीच नाही याबाबत प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांमध्ये याबाबत माहिती देने बंधनकारक होते मात्र तसे झाले नाही.प्रशासनाच्या समनवयाच्या अभावाने व्यवसायिकांचे नुकसान झाले याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.यामध्ये न प प्रशासन कोरोनाच्या काळात झोपी गेले असून जबाबदार अधिकाऱ्याचे मोबाईल हे नॉट रीचेबल असल्याने शहरातील अशा प्रकारची परिस्थिती निमार्ण झाली असताना न प चा कुठलाही अधिकारी कर्मचारी दिसला नाही.