अकोला – मागील 20 दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूची चांगलीच चर्चा सुरु आहे आणि या प्रकरणात राज्यसरकारचे वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सगळे पुरावे आहेत तरी सुद्धा साधा गुन्हा देखील नोंदवण्यात न आल्याची घटना या महाराष्ट्रात घडते आहे ही खूप खेदजनक गोष्ट आहे.
एका युवतीचा मृत्यू होतो त्यात राज्यसरकाचे मंत्री यांच्या हात असल्याचा आरोप होतो पुरावे त्यांच्या विरोधात असून सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे असा सवाल आता सामान्य जनते मधून उठत आहे तसेच पूजाच्या संशयास्पद मृत्यू वेळी तिच्याबरोबर असलेले दोघे तरुण कुठे गेले याचा साधा तपास सुद्धा वनवाडी पोलीस करत नाही त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनवाडी पोलिसांकडून पोलीस तपासचे अधिकार काढून एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्या कडे सुपूर्त करावा आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या तात्काळ राजीनामा घेऊन केलेल्या कृत्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे अशी कारवाई करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी अकोला महानगर तर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं.
यावेळी महापौर अर्चनाताई मसने,महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा चंदाताई शर्मा,गीतांजली ताई शेगोकार,सुनीताताई अग्रवाल,वैशालीताई शेळके व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी उपस्थित होत्या.