अकोला(दीपक गवई)– जिल्ह्यातील अकोला मनपा,अकोट आणि मूर्तिजापूर न.प. क्षेत्रात सद्यस्थितीत 28 फेब्रुवारी पर्यंत लॉक डाऊन चे आदेश होतेय. आता सदर लॉक डाऊन आणखी 8 दिवस वाढविण्यात आला असून 1 मार्च ते 8 मार्च या कालावधीत राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेय. या मध्ये धान्य विक्री, पेट्रोल पंप , मेडिकल आणि तसेच वैद्यकीय सेवेशी निगडित प्रतिष्ठाने ही उघडी राहणार असून त्या सोबतच परीक्षार्थी विद्यार्थी यांना ठराविक नियमावली जाहीर करून सूट देण्यात आली आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता अकोला महानगरपालिका मूर्तिजापूर व अकोट नगर परिषद क्षेत्रात जिल्हाधिकारी पापळकर यांनी संचार बंदीचे आदेश निर्गमित केले असून नवीन आदेशानुसार येत्या एक मार्च ते आठ मार्च अकोल्यात अर्थातच नमूद परिसरात लोकडाऊन चे आदेश जारी करण्यात आले आहेत.