पातूर (सुनिल गाडगे) : पातूर शहरातील होतकरू मुलां मुलींकरिता द प्रोफेशनल करिअर अकॅडमीच्या वतीने पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुरुवात उत्साहात झाली असून विद्यार्थी जोमाने उत्साहात सहभागी झाले. या सात दिवसीय आर्मी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मैदानी व लेखी प्रशिक्षणाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्याची भावी पिढी ही देशसेवेच्या कामी यावी हा या प्रशिक्षणमागचा उद्देश आहे. पातूर शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमी नेहमीच समाजहिताच्या कामात पुढे असताना दिसते. या प्रशिक्षणासाठी 16 ते 25 वयोगटातील मुलांनी कमालीची हजेरी लावली या सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये पूलअप्स, सोळाशे मीटर रनिंग, लांब उडी, गोळा फेक, इत्यादी सर्व प्रकारचे मैदानी प्रकार शिकवण्यात येत आहेत. सदर आर्मी प्रशिक्षणाचीसाठी विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुरज गवई हे असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी शिस्त व मेहनत यावर जोर देऊन प्रशिक्षणाला सुरुवात केली. स्व. वंदनाताई जगन्नाथ ढोणे वैद्यकीय महाविद्यालय येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करून घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा या प्रशिक्षणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.