तेल्हारा(प्रतिनिधी)- तापडिया गार्डन मधील सभागृहाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा ठराव २३ /१२/२०१६ च्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता, तेव्हा पासून या ठरावाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती, सभागृह बांधल्या पासून ते निनावी अवस्थेत पडलेले होते. याची माहिती संबंधित नागरिकांनी नगरसेविका सौ तायडे यांना दिली असता सौ तायडे यांनी २३ फेब्रु ला गाडगे महाराज यांच्या जयंती आधी त्या सभागृहाला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात येईल अशी ग्वाही दिली,त्यांनी त्यानुसार पाठपुरावा सुरू केला व २१ डिसेंबर २०२० सौ तायडे यांनी नगराध्यक्षा मॅडम तसेच मुख्याधिकारी साहेबांना विनंती अर्ज दिला. त्याच प्रमाणे २२ फेब्रुवारी ला संत गाडगेबाबा यांच्या जयंती च्या ठीक एक दिवस आधी त्या सभागृहाचे नामकरण करण्यात आले व शाळा क्र २ मधील गाडगेबाबा स्मारकाची डागडुजी करून रंगरंगोटी करण्यात आली.